ग्रेट लीडर...
आधुनिक भारताचे स्वप्न पाहत असतानाच विज्ञान आणि तंत्रज्ञान विकसित करत आपल्याला स्मार्टफोनच्या जमान्यात आणून सोडण्याचा पाया ज्यांनी मजबूत केला अश्या राजीव गांधी बद्दल आपण सगळ्यांनीच हमेशा विनम्र झालं पाहिजे.गांधी घराण्याने काय दिले अश्या फालतू प्रश्नात अडकून पडण्यापेक्षा,स्वातंत्र्यानंतरच्या संपूर्ण कालखंडातील विकासाचा साक्षीदार म्हणून हे कुटुंब आहे.खेड्यापाड्यात वीज पोचवणे असेल,ग्रामीण भागापर्यंत रस्ते,शाळा,दवाखाने असतील या दिसायला छोट्या गोष्टी असल्या तरी हा देश उभा करण्यात एक दृष्टी ठेवून हे कुटुंब काम करत राहिले आहे.इंदिराजी आज असायला हव्या होत्या हे सहज वाक्य सध्याचे राजकारण बघितले ओठावर येते ही खरी उपलब्धी या कुटुंबाची आहे.राजीव गांधी यांच्यात एक ऊर्जा होती,देशाला पुढे घेऊन जाण्याची ताकद होती,आणखी 10 वर्ष राजीवजी देशासाठी राहिले असते तर विकासाच्या बाबतीत भारत खूप पुढे गेला असता..राजीवजी कायम भारताच्या मनात आहेत,राहतील..देशाचा तरुण चेहरा असा संदेश त्यांच्याकडे पहिला की सहज जगभर जायचा,त्यांची कीर्ती अजरामर आहे,सामान्य माणसाला विकासाचा केंद्रबिंदू ठेवून,देशाला तंत्र विज्ञानाच्या उंबरठ्यावर नेऊन सोडणारा हा नेता तरुणाईचे प्रतीक होता.आज कुटुंबाची उपहासना करताना विरोधकांनी याचा विचार करणे गरजेचे आहे.राजीवजीमध्ये ती तडफ होती.आज त्यांची जयंती,राजीवजीना "मराठी अस्मितेचा इशारा" व जेवरीकर परिवार तर्फे विनम्र अभिवादन...
संजय जेवरीकर(ज्येष्ठ पत्रकार)
0 Comments