Latest News

6/recent/ticker-posts

औसा नगरपालिकेस औरंगाबाद उच्च न्यायालयाची कारणे(म्हणणे) दाखवा नोटीस

औसा नगरपालिकेस औरंगाबाद उच्च न्यायालयाची कारणे(म्हणणे) दाखवा नोटीस


 



औसा:(तालुका प्रतिनिधी बी.जी.शेख)दि.२१ - औसा नगरपालिकेला वैशिष्ट्यपूर्ण विविध कामाच्या निविदे संदर्भात औरंगाबाद उच्च न्यायालयाने कारणे(म्हणणे) दाखवा नोटीस बजावली आहे. मागील दोन महिन्यापासून मजूर संस्था व बेरोजगार संस्था यांनी मिळून नगरपालिकेच्या निविदे संदर्भात आक्षेप नोंदवला होता. आक्षेपामध्ये सदर काम मजूर संस्था व बेरोजगार संस्थेला आरक्षित असतानाही हे काम दुसऱ्यांना देण्यात येत आहे अशी तक्रार केली होती.यानुसार लातूर जिल्हाधिकारी यांनी नगरपालिकेला सविस्तर अहवाल देण्याचे बजावले होते.अहवालात औसा नगरपालिकेने हे काम लवकरात लवकर करून घेण्याची सबब पुढे करून हे काम मजूर संस्था व बेरोजगार संस्थेसाठी आरक्षित न ठेवता ते खुल्या वर्गातून करण्याचे स्पष्टीकरण जिल्हाधिकारी यांना दिले होते. तक्रारदार यांना जिल्हाधिकारी कार्यालयाकडून मिळालेल्या उत्तरानुसार मजूर संस्थेचे समाधान न झाल्याने त्यांनी औरंगाबाद उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली होती. या याचिकेची सुनावणी दि.२० ऑगस्ट रोजी झाली. यानुसार सदर कामासंबंधी नगरपालिकेला कारणे(म्हणणे) दाखवा नोटीस बजावली आहे.


या नोटिशीचे उत्तर औसा नगरपालिका काय देते याकडे जनतेचे लक्ष आहे. या नोटीसे नुसार नगरपालिकेचे "अर्थपूर्ण" व्यवहार पूर्ण होणार नाही,अशी चर्चा दबक्या आवाजात जनतेतून ऐकायला मिळत आहे.


Post a Comment

0 Comments