Latest News

6/recent/ticker-posts

दूध प्रश्नी औसा तहसीलदार यांना निवेदन

दूध प्रश्नी औसा तहसीलदार यांना निवेदन



औसा:(तालुका प्रतिनिधी बी.जी.शेख) औसा तालुका महायुतीच्या वतीने महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात दुधप्रश्नी तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले. शेतकऱ्यांच्या दुधाला १० रुपये अनुदान मिळाले पाहिजे.तसेच सरासरी ३० रुपये लिटर भाव आणि दुध पावडरला प्रति किलो ५० रु अनुदान मिळाले पाहिजे यासाठी भारतीय जनता पार्टी औसा शहर व तालुका पदाधिकारी यांच्या वतीने तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले.


 या मागण्यांचा लवकरात लवकर विचार करावा अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा निवेदनात देण्यात आला आहे.


यावेळी औसा तालुका भाजपा संतोषअप्पा मुक्ता,शहर अध्यक्ष लहुजी कांबळे,गटनेते सुनिलअप्पा उटगे,युवा मोर्च्या अध्यक्ष धनराज परसने, दत्ता भाऊ चेवले व शेतकरी बांधव उपस्थित होते.


Post a Comment

0 Comments