सेवेच्या नावाखाली रुग्णांना लुटणाऱ्या प्रवृत्तीवर हल्ला
लातुर येथील आल्फा हॉस्पिटल मधील डॉक्टर दिनेश वर्मा यांच्यावर प्राणघातक हल्ला... रुग्णाच्या मुलाने हा हल्ला केला, या हल्ल्याचा सर्वत्र निषेध होत आहे. पण हा हल्ला झालाच का? डॉक्टरांवर इतका संताप येण्याचे कारण काय हा हल्ला नियोजित नव्हता! डॉक्टरांच्या मनमानी, अरेरावी, रुग्णसेवेपेक्षा व्यापरीकरण व भावणी नातेवाईकांना लुबाडण्याच्या पध्दतीवर हा हल्ला होता. या हल्ल्याचे मी समर्थन करीत नसलो तरी हल्ल्याची मिमांसा करणे गरजेचे आहे. टाळी एका हाताने वाजत नाही, नाण्याच्या दोनबाजू असे काहीसे, सेवेच्या नावाखाली व्यापर करणाऱ्या, रुग्ण व नातेवाईकांच्या भावनेशी खेळत लुटमारीचा धंदा करणाऱ्या व्यवस्थेवर हा हल्ला होता. पोटाला पिळदेवु जमा केला पैसा संकटात कामाला येईल, ही जमापुंजी भविष्य सुरक्षित करेल अशी अनेक स्वप्न या पैश्यावर पेरलेली असतात. जेंव्हा ही स्वप्न शनात उद्ध्वस्त केली जातात, तिथे मरणे- मारणे अवघड नसते. डॉक्टर वर्मा यांच्यावर झालेला हल्ला सेवेच्या नावाखाली लुटमारीचा धंदा करणाऱ्या डॉक्टरांसाठी धोक्याचा इशाराच आहे.
उदगीर येथील एक कुटुंब घरातील महिलेला उपचारासाठी लातुर येथील अल्फा सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल मध्ये दाखल करतात. त्या महिलेला श्वसनाचा त्रास होत होता. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार उपचार सुरु झाला. या अगोदर भावनिक नातेवाईकांना डॉक्टर म्हणतात रुग्णांची तब्येत खुप खालावली आहे. उपचार सुरु करण्यासाठी लाखो रुपये खर्च येणार आहे. आगोदर लाखभर रुपये भरा हा व्यापारी डॉक्टराचा भावणीक नातेवाईकांन सोबत रुग्णाचा जिव वाचविण्यासाठी केलेला व्यवसायीक करार... हा करार सर्रासपणे सर्वच रुग्णालयात होतो. शिवाय रुग्ण दवाखान्यात दाखल झाला की काही कागदपत्रांवर स्वाक्षऱ्या घेता. उपचार करणारे डॉक्टर नातेवाईकांकडून रुग्णांच्या मृत्यूचा दाखलाच लिहून घेतात... उदगीरच्या अनारकला हिरालाल सकट वय ५५ वर्षे गांधी नगर या रुग्ण महिले सोबतही असेच झाले. सर्व औपचारिकता भावणीक मुलांनी पारपाडत दि. २५ जुलै रोजी आपल्या आईला अल्फा रुग्णालयात दाखल केले. उपचार सुरु झाला तब्यात सुधारत होती. डॉक्टरांनी लिहून दिलेली सर्व औषधेही वेळेवर आनुन दिली. कोणता उपचार सुरू आहे. किती मेडिकल लागेल याचा कसलाच विचार न करता आपली आई बरी व्हावी यासाठी सारी धडपड, ऊ नाही चू नाही कसला उच्चार नाही डॉक्टर सांगतील ते लगेच उपलब्ध करुन दिले. हे फक्त आणि फक्त आपली आई बरी व्हावी हाच या मागचा उद्देश!
उदगीर हुन लातुरला घेऊन जातांना आपल्या आईला दम्यामुळे श्वसनाचा त्रास होतोय हेच माहिती, डॉक्टरांवर पुर्ण विश्वास ठेवून डॉक्टर सांगतील तसेच सुरु होत. सकाळी चांगली तब्येत असलेला त्या रुग्ण महिलेला डॉक्टरांनी इंजेक्शन दिले अन् काही सेकंदात रुग्ण दगावतो काही कळायला मार्गच नाही. आईचा मृत्यू कसा झाला याची साधी चौकशी करायची नाही. माझ्या आईला काय झाले, कशी मेली, कशाचे इंजेक्शन दिले. डोसची मात्रा जास्त तर नव्हती ना, का एक्सपायर झालेल इंजेक्शन होते. चुकीचा उपचार तर केला नाही असे शकडो प्रश्न उपस्थित होत होते. या सर्व प्रश्नांना बगल देत डॉ. वर्मा पैसे भरा मुडदा घेवुन जा असा मुजोरपणा दाखवित होते. रुग्ण पॉझिटिव्ह होता, कोरोनामुळे मेला. असे उडवाउडवीची उत्तरे देत रुग्णालयातुन पळ काढण्याच्या तयारीत होते. या अरमुठ्या डॉक्टराचा प्रचंड राग येतो, लाखो रुपये डॉक्टरांच्या नरड्यात कोबुन सुधा उपचार व्यवस्थीत नाही. विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देत नाही, कोरोनाचा रिपोर्ट दाखवत नाही यांची प्रचंड चिड येते, या रागातच पळून जात असलेल्या डॉक्टरला अडवुन रुग्णालयातील कैचीने डॉक्टरवर सपासफ वार होतो. हा रोष होता डॉक्टराच्या निर्लज्ज, भावणाशुन्य व सेवच्या नावाखाली व्यापार करणाऱ्या प्रवृत्तीवर झालेला हा हल्ला आहे. सुदैवाने या हल्ल्यात डॉ. दिनेश वर्मा किरकोळ जखमी झाले. यानिमित्ताने तुम्हा- आम्हाला पुन्हा एकदा विचार करावा लागेल. सेवेच्या नावाखाली व्यापार करणाऱ्या डॉक्टरांवर कुठे तरी अंकुश ठेवण्याच्या गरज आहे. प्रत्येक रुग्णाकडुन लाखो रुपये लुटने थांबले पाहिजे. डॉक्टरांसाठी कायदा होतो, तसा कायदा रुग्णांच्या संरक्षणासाठी ही हवा. सर्वच डॉक्टरांच्या उपचाराचे दर निश्चितच व सारखेच असावे. डॉक्टरांच्या मनमानी करभारावर नियंत्रण ठेवण्यासाठी एक स्वतंत्र व्यवस्था असावी तरच डॉक्टरांवर भविष्यात असे हल्ले होणार नाहीत.
सुनील मारोतीराव मादळे(पत्रकार)
0 Comments