Latest News

6/recent/ticker-posts

औसा येथील जलकुंभाचे काम प्रगती पथावर

औसा येथील जलकुंभाचे काम प्रगती पथावर



औसा:(तालुका प्रतिनिधी बी.जी.शेख)दि. २० - औसा शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या जलकुंभाचे काम कधी पूर्ण होणार याकडे औसा शहरातील नागरिकांचे लक्ष लागून आहे. औसा शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मुख्य जलकुंभात या जलकुंभाचा नंबर येतो. ही टाकी खूप जुनी होती त्याला तोडून नवीन टाकीचे बांधकाम करण्यात येत आहे.


शहराला नेहमीच पाण्याचा प्रश्न भेडसावत असतो .मात्र येणाऱ्या काळामध्ये शहराला पाणी पुरवठा करण्यासाठी माकणी धरणातुन पाणीपुरवठा करण्याची योजना मान्य झाल्याने त्याचे काम जोरात सुरू आहे. या पाईप लाईन चे कनेक्शन या टाकीला जोडण्यात येणार असल्याने या टाकीचे काम जोरात सुरू आहे.


शहराला ऊट्टी येथील तलावातून पाणीपुरवठा केला जातो या वेळेला हा तलावच कोरडा असल्याने चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते .मात्र माकणी धरणातून येणार्‍या पाण्यामुळे शहरातील जनतेचा पाण्याचा प्रश्न काही अंशी सुटेल अशी आशा आहे.


Post a Comment

0 Comments