राज्यातील मंदिरे उघडण्यासाठी भाजपचे औश्यात घंटानाद आंदोलन
औसा:(तालुका प्रतिनिधी बी.जी.शेख) दि.२९ - कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर गेल्या चार महिन्यांपासून बंद असलेली राज्यातील मंदिरे उघडण्याच्या मागणीसाठी भाजपच्या वतीने आज राज्यभर आंदोलन करण्यात येत आहे. औसा येथे झालेल्या आंदोलनात भाजप कार्यकर्त्यांनी दाटीवाटीने उभे राहून घंटानाद केला. कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी म्हणजे सोशल डिस्टन्सिंगचे कटाक्षाने पालन करा, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी वारंवार सांगत आहेत. मात्र भाजप कार्यकर्त्यांनी या आंदोलनात त्यांचाच आदेश धुडकावून लावला. दारू दुकाने, मॉल्स उघडली जात आहेत. सगळ्या गोष्टी उघडत आहात. त्यामुळे मंदिरे उघडण्याचा आग्रह असेल तर तो योग्य आहे, अशी भूमिका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी कालच मांडली होती. कोरोनामुळे बंद असलेली मंदिरे पुन्हा सुरू करण्याच्या मागणीसाठी राज्यातील विविध धार्मिक संस्था आणि देवस्थानांच्या वतीने राज्यभर घंटानाद आंदोलनही केले जात आहे. भाजपने या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. त्याचाच एक भाग म्हणून आज भाजप कार्यकर्त्यांनी औसा शहरात आंदोलन केले. हनुमान मंदिर चौकात केलेल्या या आंदोलनात भाजप कार्यकर्त्यांनी घंटा वाजवून आंदोलन केले. औसा शहरात कार्यकर्त्यांनी सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळून हे आंदोलन करणे अपेक्षित होते. या आंदोलनात औसा तालुक्याचे आमदार अभिमन्यु पवार यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
0 Comments