Latest News

6/recent/ticker-posts

काळजाच्या कप्प्यातून...

काळजाच्या कप्प्यातून...



ध्याच्या धावपळीच्या जीवनात आपण आपल्या मुलांना टाईम देऊ शकत नसतोत. जेव्हा पाल्य (मुलगा /मुलगी) जस जस वयानी वाढत असतात तसच त्यांना आई वडिलांनी वेळोवेळी मार्गदर्शन केल पाहिजे कारण जस पाल्य ( मुलगा / मुलगी) वयाने वाढत असतात तसच काही गोष्टीत त्याची निर्णय घेण्याची क्षमताही वाढत असते. त्यावेळेस पालकांनी आपल्या पाल्याला समजून त्याच्या सोबत वेळ देऊ त्याच्या मनातील निर्णय घेण्याच्या मनस्थितीला पालकांनी आपल्या ताब्यात घेऊ योग्य ते मार्गदर्शन करु शकतात. तेही केव्हा जेव्हा आपण आपल्या पाल्याला वेळ देऊ त्याच्या सोबत फ्रेंडली राहू.


    मात्र जेव्हा आपण आपल्या पाल्याला वेळ नाही देणार तेव्हा त्याच्या मनात विविध विचार येतात. जसे की कोणीतरी त्याच ऐकावं तो कुठल्यातरी हक्काच्या व्यक्ती समोर मनमोकळे पणाने बोलव. म्हणून तो आजुबाजुला जे चालू आहे म्हणजेच "प्रेम" अशा प्रकारात पडुन एक हक्काची व्यक्ती बनवण्यात रमतो. कुठेतरी पालकाच पाल्यापासुन ( मुलगा /मुलगी) लक्ष हटत. मग आपला पाल्य प्रेम प्रकरणात अडकतो. मग तो कुठेतरी आपल्या पालकांपासून दुरावत जात असतो. जेव्हा आपली पाल्य (मुलगा /मुलगी) कॉलेजात जातात तेव्हा ती त्यांची कॉलेजलाईफ बनते. मग कॉलेज जीवनातील प्रत्येकाचे अनुभव हे वेग वेगळे असतात. काहीजण कॉलेज करत घरच्यांना हातभार म्हणून त्याच्या सोबत काम करतात मग ते शेतात असेल केव्हा कुठे तरी जॉब याअंतर्गत मदत करत असतात. मात्र काही पाल्य (मुलगा /मुलगी) त्यांना काम करायची गरज नसते कारण त्याच्याकडे मोठ्या प्रमाणात पैसा असल्याचे आई वडील दाखवून देतात आणि त्याचाच कुठे तरी परिणाम पाल्यावर होतो त्याला कष्ट काय असतात याची जाणीव होत नाही. यामुळे तो बिनधास्त असतो. 


      कॉलेज जीवनात काही गोष्टी आजूबाजूला दिसुन येतात. त्या एक म्हणजे तरूण तरूणी एकमेकांच्या प्रेमात पडलेले. मात्र त्या पाल्यांना त्याच्या पुढील आयुष्या बदल माहीत नसतं. किंवा पुढे काय होणार काय घडणार या बदल त्यांना काहीच माहिती नसते.


       प्रेमात पडलेल्या तरूण तरुणींना त्याच्या प्रेयकर व प्रेयसी या शिवाय दुसऱ्या कुठल्याच गोष्टीला ते महत्व देत नाहीत. मग कॉलेज बुडवून इकडे तिकडे फिरने, कॉफीशॉप, एकमेकांच्या वाढदिवसा दिवशी मोठ मोठ्या हॉटेल्स मध्ये मित्र मैत्रिणींना पार्टी देणे असे प्रकार घडत असतात. ह्या पार्ट्या देण्याचा उद्देश म्हणजे आम्ही दोघे किती एकमेकांवर प्रेम करतो हे दाखवून देण्याचा प्रयत्न असतो. या प्रयत्नांमुळे आपण ज्या ठिकाणी राहतो तेथील काही लोकांना अपेक्षित पणे ह्या गोष्टी कळतात व दिसुन येतात. काही दिवसात ह्या गोष्टी दोन्ही घराला येऊन पोहचतात. 


       मग हे प्रेयकर प्रेयसी आता कुठे तरी पुढला पाउल उचलण्यात तयार होत असतात आणि तो म्हणजे "सैराट". आता सैराट का होतो एकीकडे आपण जेथे राहतो त्या ठिकाणी आता पण "जातीवाद" नावाची किट आहे. त्यामुळे कित्येक प्रेम प्रकरण अर्ध्या तुटलेले आहेत. एकीकडे मुलाच्या घरचे तयार होत असतात तर एकीकडे मुलीच्या घरचे तयार होत नाहीत. सेम तसच मुलीच्या घरचे तयार असतात तर मुलांच्या घरचे तयार नसतात. या गोष्टी मुळे प्रेयकर व प्रेयसी याच्यात काही प्रमाणात दुरावे निर्माण होत असतात.


       मग आता पालकांना आपल्या पाल्याच्या भविष्याची काळजी वाटत असते. पुढे काय होणार?आपल्या पाल्यानी काही चुकीचा पाउल उचलला तर कस होणार? समाजात आपली इज्जत राहणार नाही असे भरपूर प्रश्न पालकांच्या मनात पडलेले असतात. जस एका नाण्याला दोन बाजू असतात त्याच पध्दतीने कुठे तरी आपण आपल्या पाल्याच्या दुसर्‍या बाजूकडे म्हणजे त्या पाल्यांना आई वडीलांनी न देलेला टाईम असतो. पहिलच मनल जात टाळी एका हाताने वाजत नाही.जेव्हा पालकांना आपल्या पाल्याच्या प्रेम प्रकरणा बदल कळत. तेव्हा पासून ते आपल्या पाल्याला (मुलगा /मुलगी) समजवण्याचा प्रयत्न करत असतात. यात दोन पध्दतीने समजवल जात एक भावनिक तर एक मानसिक त्रास देऊन त्यांचे निर्णय बदलण्याचा प्रयत्न असतो. ९०% प्रकरणात पालकांना पाल्याचा निर्णय बदलण्यात यश येतो तर १०%प्रकरणात निर्णय बदलण्यात अयश येत.


         मुलगा आणि मुलगी जेव्हा प्रेम करतात तेव्हा घरच्यांना विचारत नाहीत. जेव्हा लग्नाचा विषय येतो तेव्हा काही मुल आणि मुली निर्णय बदलतात. मग निर्णयच बदलायच असेल तर प्रेम कशाला करायच. एकीकडे मुलगा /मुलगी प्रेमात असताना आयुष्यभर एकमेकांना साथ देण्याचा निर्णय घेतात व एकमेकांना वचन ही देतात. तसेच भरपुर लोकांना त्यांच्या प्रेमाची माहिती झालेली असते. मात्र त्यांनी बदलेल्या निर्णयामुळे पुढील आयुष्यात भरपूर अडचणी येण्याच्या शक्यता असतात. त्यामुळे आयुष्यात काही निर्णय पालकांनी व पाल्यानी एकत्र बसवून विचार विनिमय करून घ्यावेत. जेणेकरून पाल्याच्या (मुलगा /मुलगी) पुढील भविष्यात काही अडचणी येणार नाहीत. त्या अडचणी मुळे पालकांनी किंवा पाल्यानी चुकीचा पाउल उचलू नये. 


        पालकांनी (आई वडील) पाल्यासाठी (मुलगा /मुलगी) जेथे स्थळ बघतिल त्याच्याशीच लग्न करायच. मात्र प्रेम करून पालकांनी पाल्याला बदलायला लावलेल्या निर्णयामुळे एखाद्याला (मुलगा /मुलगी) तडपवत सोडायच हे पण चुकीचं आहे . या गोष्टीमुळे भरपूर पाल्य आपल्या पुढील जीवाचा निर्णय न घेता जीवन संपवतात तर काहीजण आयुष्यात हारल्या प्रमाने वागतात.


            प्रेम करन सोप आहे मात्र प्रेम निभावणं अवघड आहे. त्यात intercast असेल तर मोठ्या प्रमाणात अडचणी येत असतात. प्रेम सगळ्याच खर असत मात्र काही अडचणी मुळे ते खोट्यात उतरत जात असत... RELATIONSHIP अशी गोष्ट आहे ज्यात एकमेकांना खुप समजून घ्याव लागत. रिलेशनशीप मध्ये misunderstanding झाल्या तर ते रिलेशनशीप जास्त दिवस राहत नाही. छोट्या छोट्या गोष्टीतुनच मोठ मोठे वाद होत असतात.


            रिलेशनशीप मध्ये दोन प्रकारच्या अडचणी येतात. एक त्यांच्या / तिच्या फॅमिली कडुन तर एक एकमेकांना न देलेला वेळ असेल किंवा misunderstanding मुळे.


           त्याच्या /तिच्या फॅमिलीला हा रिलेशनशीपला विरोध असतो त्यातील महत्त्वाच्या काही गोष्टी १)जात २) सेटल ३) एज्युकेटेड ४) प्रोफेशनल या गोष्टी मुळे कित्येक रिलेशनशीप तुटलेले आहेत. एकीकडे आपल्या देश सर्व बाबतीत पुढे मात्र जातीवाद नावाची कीड अद्याप कमी झालेली नाही. सेटल ही बाब मुलामध्ये खुप बारकाईने बघितली जाते. एका वेळेस जात एक्सेप्ट केली जाईल मात्र मुलगा सेटल आहे का नाही या गोष्टीवर खुप चर्चा होत असते. मुलाच्या नावे किती प्रोपर्टी आहे तो काय जॉब करतो वर्षाला किती कमवतो. पुर्ण फॅमिलीच वर्षाच टोटल इन्कम किती. बंगला, चार चाक्या किती अशा गोष्टी येतात. पण प्रेमात एकीकडे पैशाला महत्त्व नसत असही मनल जात मात्र पैसा बघुनच कित्येक लग्न जमवतात आपण बघतच असतोत.


           एज्युकेशन मनाल तर प्रत्येकाचे वेगवेगळे स्वप्न असतात. मुलगा /मुलगी एज्युकेशन बाबतीत योग्यच निर्णय घेत असतात. तर काही ठिकाणी एज्युकेशन रिलेशनशीप मध्ये आल्यावरही पुर्ण झालेले आहेत. मात्र आताच्या फॅमिलीला मुलगा /मुलगीच एज्युकेशन जास्त पाहिजे किंवा सेम तरी असल पाहिजे. प्रोफेशन मध्ये जॉब येईल मुलगा / मुलगीच राहणीमान येईल. तो /ती किती कमवते तर काही ठिकाणी मुलीला जॉब करू नकोस अशा पण गोष्टीचे अडथळे आणले जातात.


          जेव्हा मुलगा व मुलगी प्रेमात असतात तेव्हा सर्वात महत्त्वाची गोष्ट असते ती म्हणजे एकमेकांच्या आवडी निवडी. दोघांच्या सारख्याच असतील अस नाही मात्र काही गोष्टीत त्या दोघांना समजुतदारीने घेतल पाहिजे. चुका ह्या माणसाकडून होतात तर कधी मुलाकडून होऊ शकतात तर कधी मुलीकडून यात पण खुप समजूतदारपणेच त्या चुका एकमेकांना सोडवल्या पाहिजे किंवा दुर्लक्ष केल्या पाहिजेत. काही वेळेस तुमच्या झालेल्या चुका लोकांसाठी खुप फायद्याच्या ठरतात. कारण त्या तुमच्या तुटत असलेल्या रिलेशनशीपला पाहुन आनंद होत असतो. म्हणून दोघांच्या चुका दोघांनीच आप आपल्या परिने सोडवल्या पाहिजेत तिसर्‍याला त्यात सहभाग घेऊ द्यायच्या नाहीत.


             रिलेशनशीप मध्ये खुप अडचणी येत असल्या तरी त्या दोघानेच सोडवले पाहिजेत कारण प्रेम करणारे व एकमेकांना आयुष्यभर साथ देणारे तेच असतात.


 


उमेश कांबळे, लातूर


Post a Comment

0 Comments