हणमंतवाडी च्या नागरिकांची सुरेंद्र धुमाळ यांनी केली स्वप्नपूर्ती
निटूर:(प्रतिनिधी) निलंगा तालुक्यातील हणमंतवाडी मुगाव येथे महाराष्ट्र शासनाच्या राष्ट्रीय पेयजल योजनेतून पाणीपुरवठा नळयोजना पुर्ण करून हणमंतवाडी च्या नागरिकांची स्वप्नपूर्ती केली व हणमंतवाडी ला दिलेला शब्द सुरेंद्र धुमाळ यांनी पाळला.
उन्हाळ्यात मोठ्या प्रमाणात पाण्यासाठी महीला, पुरूष व युवकांची गैरसोय होत होती. त्यामुळे हणमंतवाडी मुगाव ग्रामपंचायत सरपंच प्रतिनिधी व जिल्हा परिषद सदस्य प्रतिनिधी या नात्याने त्यांनी यासाठी विशेष प्रयत्न करून कायमस्वरुपी एक शास्वत पाण्याचा स्तोत्र म्हणून मसलगा मध्यम प्रकल्पाच्या बाजुला बोअर घेऊन मसलगा येथून हणमंतवाडी गावाला पाईपलाईन केली व गावअंतर्गत पाईपलाईन करून प्रत्येकाला नळाद्वारे पाणीपुरवठा सुरू केला आहे.
या स्वप्नपूर्ती साठी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे सरचिटणीस अशोकराव पाटील निलंगेकर यांचे व बोअरसाठी विनामूल्य जागा दिल्याबद्दल मसलग्याचे प्रगतशील शेतकरी विलासराव पाटील, दिलीपराव पाटील, दिनकरराव पाटील यांचे ग्रामस्थांच्या वतीने सुरेंद्र धुमाळ यांनी आभार मानले आहेत.
हणमंतवाडी गावाला नियमित पाणीपुरवठा करण्याची स्वप्नपूर्ती केल्याबद्दल संदिपान कावळे, अशोक जाधव, कुमार पाटील, योगेश कावळे, गोविंद कावळे, गणपत जाधव, किशन सुर्यवंशी, वसंत कावळे, दत्ता शिरमाळे, सुग्रीव माने, शाहुराज पाटील, व्यंकट सुर्यवंशी, दत्ता कावळे, हणमंत पाटील, उमाकांत देशमुख, पुरुषोत्तम देशमुख, नामदेव काळे, दत्ता शिंदे, परमेश्वर रूबदे, शैलेश रूबदे आदीसह गावातील पुरुष, महीला व युवकांकडून सुरेंद्र धुमाळ यांचे कौतुक होत आहे.
0 Comments