अव्यक्त शब्दसिंधु साहित्य समुहा तर्फे राज्यस्तरीय ऑनलाईन काव्य स्पर्धा
बीड:(प्रतिनिधी) श्रावण महिना म्हणजे चहूकडे पसरलेली हिरवळ आणि उत्साहित ऊर्जा देणारे वातावरण अशा या सुंदर वातातवरणात नवोदितांच्या लेखणीचा आस्वाद घेण्यासाठी अव्यक्त शब्दसिधु यांनी एक उपक्रम हाती घेतल आहे. सुप्रसिद्ध कवी, गझलकार, लेखक, वक्ता आणि अव्यक्त शब्द सिंधू समूहाचे प्रेरणास्थान असणारे अनंत विठ्ठल राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच किशोर (नाना) पारधे, स्वच्छता व आरोग्य सभापती, नगरपरिषद परळी वै. जी. बीड यांच्या सौजन्याने हा उपक्रम योजिले आहे.श्रावण महिन्यात येणाऱ्या अनेक सणांचे महत्व जाणण्याचा दृष्टीने श्रावणातील सण हा विषय देऊन अव्यक्त शब्द सिंधु समूहाने राज्यस्तरीय श्रावणमासी काव्यस्पर्धा १० ऑगस्ट २०२० रोजी आयोजित केली असून रू. २५/- फक्त प्रवेश शुल्क आकारले आहे. या स्पर्धेत १५० स्पर्धकांना समाविष्ट केले जाणार असून विजेत्यांचे सन्मानपत्र पत्त्यावर पाठविले जाणार आहे तसेच सहभागी प्रमाणपत्र ऑनलाईन दिले जाणार आहे त्यातील काही दर्जेदार कविता प्रकाशित केल्या जाणार आहेत.
तसेच जमा झालेल्या एकूण रकमेतून रुद्र प्रतिष्ठान संस्थेला २०% राशी दान करण्याचा हेतू आहे. स्पर्धा ऑनलाइन घेतली जाणार असून शुल्क हे गूगल पे,फोन पे ,भीम या द्वारे ऑनलाइन घेतले जाणार आहे,
समूहाचे अध्यक्ष मनोज सूर्यवंशी यांनी उपक्रम राबवून नवोदितां च्या भावनेला लेखणी द्वारे मांडण्यासाठी एक हक्काचे व्यासपीठ मिळवून दिले आहे.
0 Comments