डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर यांची कोरोना आजारावर मात
निलंगा:(प्रतिनिधी) कोरोना विषाणूचा (कोव्हीड-१९) प्रार्दुभावाखाली माजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील निलंगेकर आले होते आता त्यांचा कोरोना आजाराचा त्यांचा अहवाल निगेटिव्ह आला असून, त्यांनी त्यांच्या संघर्षाच्या नेतृत्व गुणातुन वयाच्या ९१ व्या वर्षी कोरोना आजारावर मात केली आहे. त्यांची प्रकृती चांगले असून सुधारणा होत आहे या काळात त्यांच्या तब्येतीबद्दल प्रियंका गांधी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री, लातूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांनी विचारपूस व सहकार्य केले तसेच निलंगेकर परिवारावर सतत प्रेम करणारे कार्यकर्ते यांनी निलंगेकरांची तब्येत लवकरात लवकर बरी व्हावी यासाठी देवाला अभिषेक करणे, प्रार्थना करणे,साकडे घालने, या त्यांच्या आपुलकीने आशीर्वादाने दादासाहेब कोरोना आजारातुन बरे झालेे. या सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करतो निलंगेकर परिवारावर असेच प्रेम अशीच आपुलकी भविष्यातही राहील अशी अपेक्षा व्यक्त करतो अशी पोस्ट सोशल मीडियाद्वारे अशोक शिवाजीराव पाटील निलंगेकर(सरचिटणीस महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी) यांनी कळविले आहे.
0 Comments