लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त आटोळा येथे कोरोना योद्धास सॅनेटाईझरचे वाटप
चाकूर:(प्रतिनिधी/स्लीमभाई तांबोळी)तालुक्यातील आटोळा येथे आज साहित्य सम्राट लोकशाहिर अण्णाभाऊ साठे यांच्या १०० व्या जयंती निमित्त अटोळा गावचे तंटामुक्त अध्यक्ष सचिन शेटे याच्या प्रयत्नातुन मित्र प्रेम ग्रुपच्या वतिने अंगणवाडी कर्यकर्ती,आरोग्य कर्मचारी,आशा स्वंयसेविका आणि लाईनमन या सर्व करोना महायोध्यांना महात्मा गांधी तंटामुक्ति समिती व मित्र प्रेम ग्रुपच्या वतिने सानिटायझरचे वाटप करण्यात आले.चाकूर तालुक्यात अनेक ठिकाणी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी केली जात असून अटोळा येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंत्ती निमित्त भव्य रांगोळी काढून,झेंडावंदन करून अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन करण्यात आले व कोरोना सारख्या महामारीत आपल्या जिवाची पर्वा न करता काम करणाऱ्या आरोग्य कर्मचारी,अशा कार्यकर्ती,आंगणवाडी सेविका,विरभद्र बागवे शिक्षक, लाईनमन यांना प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करून मित्र प्रेम ग्रुपच्या वतिने या कोरोना योद्धास सॅनेटाईझरचे वाटप करून लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन करण्यात आले.यावेळी तंटामुक्ति अध्यक्ष सचिन शेटे, उपाध्यक्ष संतोष कलवले, शिवशंकर रावळे, माधव शेरे, अंगद कलवले, पोलिस पाटिल गणेश फुलारी,संदिप गंगापुरे, महेश शेटे, लोहारे अजय, विकाश कोरे, अंतेश्वर गंगापुरे, माधव रावळे, जयंती समीतिचे सर्व कार्यकर्ते यांनी सहकार्य केले.अंगणवाडी सेविका,आशा सेविका,आरोग्य कर्मचारी,लाईनमन,दत्ता कलवले, संदिप कलवले, प्रशांत कलवले आदि मान्यवर उपस्थित होते.
0 Comments