हुसेनिया मुस्लिम फाउंडेशन नळेगावच्या वतीने १०० मास्क व १०० सॅनिटायझरचे वाटप
चाकुर:(ता.प्र.सलीमभाई तांबोळी) तालुक्यातील नळेगांव या गावामध्ये कोरोना विषाणूचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाला होता. गावामध्ये ५७ कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण आढळले होते. नळेगांव गावामध्ये भितीचे वातावरण पसरले होते. शनिवार दि.८ अॉगष्ट २०२० रोजी नळेगांव येथे हुसेनिया मुस्लीम फाउंडेशन च्या वतीने मास्क व सॕनिटायझर वाटप केले गावातील आरोग्य कर्मचारी यांना मास्क व सॅनिटायझरचे वाटप करुन ग्रामपंचायतला कार्यालयात वापटसाठी देण्यात आले. कोरोना विषाणूने जगासह भारतामध्येही मोठ्या प्रमाणावर थैमान घातले असून विशेष करून महाराष्ट्रातील ग्रामीण भागात प्रादुर्भाव वाढला असून लातुर जिल्ह्यातील ग्रामीण भागामध्येही मोठ्या प्रमाणावर रुग्ण आढळून येत आहेत. चाकुर तालुक्यातील नळेगांगामध्ये दुर्दैवाने या विषाणूचा शिरकाव झाला. यामध्ये कांही व्यक्तीचा कोरोनाशी लढा देताना मृत्यू झाला. त्यानंतर गावामध्ये ५७ पॉझिटिव्ह रुग्ण आडळले. या संकटकाळात रविवार दि. ८ अॉगष्ट २०२० हुसेनिया मुस्लिम फाउंडेशनच्या वतीने आरोग्य कर्मचारी यांना मास्क व सॕनिटायजरचे वाटप करुन ग्रामपंचायत येथे तलाठी अविनाश पवार यांना देण्यात आले. सदर फाउंडेशनचे अध्यक्ष यांनी गावकऱ्यांना कोरोना विषाणू या महामारीच्या संकटाच्या काळात जनतेने घाबरून न जाता त्याचा समर्थपणे मुकाबला करण्याचे आवाहन केले. मास्क वापरणे, वेळोवेळी हात धुणे, सोशल डिस्टन्स पाळणे, शक्यतो अत्यावश्यक काम असेल तरच घराबाहेर पडणे या सर्व बाबी पाळून, शासनाच्या सर्व नियमांचे पालन करून आपली स्वतःची व आपल्या कुटुंबाची काळजी घेऊन कोरोनाला हद्दपार करता येईल असेही अहवान फाउंडेशन च्या वतीने करण्यात आले.
यावेळी आशाताई कार्यकर्ती,अंगनवाडी कार्यकर्ती मदतनिस ,ग्रामपंचायत कर्मचारी व आरोग्य विभागांच्या कर्मचारी यांच्यासाठी १०० मास्क व १०० सायनियटझर सुपुर्द केले. नागरिकांची शासन नियमांचे पालन करत सामाजिक अंतर ठेवून उपस्थिती होती. याप्रसंगी नळेगांचे तलाठी अविनाश पवार यांच्याकडे हुसेनिया मुस्लिम फाऊंडेशन नळेगाव अध्यक्ष मुदस्सीर जहागिरदार,सचिव चांद मचकुरी,सहसचिव युनुस मुजावर,सदस्य मुनीर खुरेशी,अजमत सौदागर,फिरदोस खुरेशी,आसिफ संगतराज,शफीयोद्दीन मौलाना,डॉ.मसुद देशमुख अशपाक मुजावर यांनी संकट काळात येऊन भेट दिल्याबद्दल व साहित्य वाटप केल्याबद्दल नळेगावात त्यांच्या कार्याचे कौतुक होत आहे.
0 Comments