Latest News

6/recent/ticker-posts

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची विटंबना करणाऱ्या समाज कंटकास तात्काळ अटक करा

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची विटंबना करणाऱ्या समाज कंटकास तात्काळ अटक करा



रि.पा.ई [आठवले]व वंचित बहुजन आघाडी चाकुरची निवेदन देऊन मागणी 


चाकुर:(ता.प्र.सलीमभाई तांबोळी) माळेगांव ता.लोहा जि.नांदेड येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची विटंबना करणाऱ्या समाज कंटकास तात्काळ अटक करावी.अशी मागणी महाराष्ट्र राज्यांचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना तहसिल कार्यालय चाकुरच्या मार्फत निवेदन देऊन करण्यात आली.मागणीचे निवेदन चाकुर तहसिलदार डॉ.शिवानंद बिडवे यांनी स्विकारले. रि.पा.ई.चाकुर तालुका व वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आज रोजी निवेदन देण्यात आले.प.पुज्य डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुर्णाकृती पुतळा अनेक वर्षापासुन माळेगांव (याञा) ता.लोहा जिल्हा नांदेडरोड वर उभा आहे.दि.५/८/२० रोजी राञी जातीय भावनेतुन समाज कंटकांनी विटबंना केलेली आहे.या घटनेचा आम्ही जाहीर निषेध करतो आहे.डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची देखभाली साठी,दुरुस्ती आणि संरक्षणासाठी शासनांने ग्रामपंचायतकडे तातडीने देण्यात यावे.अशा प्रकारे भविष्यामध्ये राज्यात अनुचित प्रकार होणार नाहीत.याची शासनाने दक्षता घ्यावी.विटंबना करणाऱ्या समाज कंटकास कठोर शिक्षा करावी.आन्यथा रि.पा.ई.(आठवले) वंचित बहुजन आघाच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यांचा इशारा निवेदनात देण्यात आला. चाकुर नगरपंचायतचे माजी नगराध्यक्ष मिलिंद महालिंगे,रि.पा.ई.(आठवले)चाकुर तालुका अध्यक्ष पपन कांबळे,रिपाईचे ज्येष्ठ नेते लक्ष्मण तिकटे,वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष मार्शल माने,रामेश्वर हाके पाटील,सुनिल कांबळे,वर्धमान कांबळे,नितीन डांगे,रोहीत कांबळे ,राम मोठेराव,शुभम महालिंगे,सुरज उडाणशिव,दिनेश कांबळे,कुलदिप कांबळे,अरुण कांबळे,महेश बिरादार,दाऊत सौदागर आदीच्या स्वाक्षरी आहेत.


Post a Comment

0 Comments