पत्रकार स्व.गंगाधर(दादा) सोमवंशी यांच्या वारसाला कोविड अंतर्गत ५० लाख रुपयांचा निधी द्या
चाकूर पत्रकार संघाची मागणी; तहसिलदार डॉ.शिवानंद बिडवे यांनी मागणीचे निवेदन स्विकारले
चाकुर:(ता.प्र.सलीमभाई तांबोळी) लातूर येथील पत्रकार स्व.गंगाधर(दादा)सोमवंशी यांच्या वारसाला कोविड अंतर्गत ५० लाख रुपयांचा निधी देण्यात यावा यासाठी चाकुर तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतीने तहसीलदार शिवानंद बिडवे यांना निवेदन देण्यात आले. राज्यात दिवसेंदिवस कोरोनाचा दर वाढला असून यात अनेकांचा मृत्यू होत असल्यामुळे राज्य शासनाने शासकीय कर्मचारी व पोलीस कर्मचारी यांना कोरूना मुळे मृत्यू झाल्यास ५० लाख रुपयांची मदत देण्यात येईल असा आदेश काढला आहे.तसेच पत्रकाराचा कोरोनामुळे मृत्यू झाल्यानंतर ५० लाख रुपये देण्यात येतील अशी घोषणा करण्यात आली होती.त्यानुसार लातूर येथील ज्येष्ठ पत्रकार गंगाधरजी सोमवंशी यांचा नुकताच कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.त्यांची आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्यामुळे त्यांच्या वारसांना शासनाने ५० लाख रुपयांची आर्थिक मदत तातडीने देण्यात यावी या संदर्भात तहसीलदार शिवानंद बिडवे यांना चाकुर तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतीने निवेदन देण्यात आले.यावेळी पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष अशोक वाकळे, जिल्हा मराठी पत्रकार संघाचे सरचिटणीस संगमेश्वर जनगावे, जेष्ठ पत्रकार सुधाकर हेमनर,पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष माधव वाघ, पत्रकार संघाचे सचिव सतिश गाडेकर, पत्रकार सुशिल वाघमारे,गणेश स्वामी, प्रशांत शेटे आदींच्या उपस्थितीमध्ये तहसिलदार शिवानंद बिडवे यांना वरील मागणींचे निवेदन देण्यात आले.
0 Comments