Latest News

6/recent/ticker-posts

लातूर ज़िल्ह्यात रक्तदान शिबिरांची गरज

लातूर ज़िल्ह्यात रक्तदान शिबिरांची गरज



लातूर:(प्रतिनिधी) कोरोनाने पूर्ण जगात हाहाकार माचला आहे. लातूर ज़िल्ह्यात भेडसावत असलेल्या रक्तदानाचा तुटवडा मोठ्या प्रमाणात जाणवत आहे. आणि त्यातून थायलेसिमिया, व रक्तसंबंधी असणाऱ्या आजारांच्या रुग्णांची होणारी गैरसोय लक्षात घेता लातूर ज़िल्ह्यातील रक्तदान शिबिर आयोजकांनी आप आपल्या भागात रक्तदान शिबिराचे आयोजन करावे. व जे इच्छुक रक्तदात्यांनी जवळील रक्तपेढीत येऊन रक्तदान करावे. कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. सध्या कोरोनाबाधित रुग्णांना जीवनदान देण्यासाठी प्लाज्मा थेरपी सध्या उपयुक्त ठरत आहे. मात्र पुरेसे दाते उपलब्ध होत नसल्याने प्लाज्मा थेरपीमध्ये अडथळे निर्माण होत आहेत. कोरोनामुक्त रुग्णांनी आपणहून पुढे यावे, व प्रशासनाने प्लाज्मा थेरपी साठी कोरोनामुक्त रुग्णांना मार्गदर्शन करावे. प्लाज्मा दान कोण करू शकतो ?


ज्या व्यक्तीची कोरोना टेस्ट निगेटिव्ह येऊन २८ दिवस होऊन गेले आहेत.


प्लाज्मा देणाऱ्याचे वर १८ ते ६० वर्षांच्या दरम्यान असावे.


प्लाज्मा देणाऱ्याचे वजन ५५ किलोच्या वर असावे.


ज्यांना कोणाला बीपी, शुगर, दमा, हृदयाचा व किडनीचा आजार आहे ते प्लाज्मा दान करू शकत नाहीत.


गर्भवती स्त्रिया प्लाज्मा दान करू शकत नाहीत.


प्लाज्मा थेरपी मध्ये जास्त रक्त काढले जातं नाही फक्त 50 मिली रक्त वापरले जाते.


रुग्ण निगेटिव्ह येऊन तीन महिने होऊन गेले असतील तर प्लाज्मा दान करता येत नाही.


अर्ध्या तासात दोघांना जीवनदान करण्याचे पुण्य मिळते.


कोरोनाच्या महामारीत स्वतःचे आरोग्य जपण्यात गुंतलेल्यांच्या गर्दीत दुसऱ्याच्या जीवासाठी धडपडणाऱ्या रक्तदात्यांचे कार्य माणुसकीच्या जिवंतपनाची साक्ष देणारी स्पंदने आहेत. जर आपल्यास योग्य रक्तगटाच्या रक्तदाता उपलब्ध होत नसेल तर आपण लव लातूर जीव लातूर टीमला संपर्क करावे. "असे मराठी अस्मितेचा इशारा" च्या प्रतिनिधीशी वैभव दत्तनगिरे बोलते वेळी म्हणाले.


Post a Comment

0 Comments