डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज यांच्या नावे स्मरण झाड लावून धनेगावकरांनी वाहिली श्रद्धांजली
देवणी:(प्रतिनिधी/विक्रम गायकवाड) डॉ.शिवलिंग शिवाचार्य महाराज यांचे काल दुःखद निधन झाले. परमपूज्य अप्पाच्या स्मरणार्थ स्मरण झाडे लावावे हीच आप्पासाठी खरी श्रद्धांजली आहे असा विचार धनेगावकरांनी मांडला गावातील सुभाष गुरुजी व किशोर बिराजदार यांनी झाडे लावण्यासाठी सहकार्य केले यांच्या हस्ते स्मरण झाडे लावून व फोटोपूजन करून मौन पाळून डॉ.शिवलिंग शिवाचार्य महाराजांना श्रद्धांजली वाहण्यात आली यावेळी ग्रामसेवक श्रीकांत पताळे, लिंबराज बिरादार, नागोराव बिरादार, सूर्यकांत बिरादार, परमानंद चरपले, ज्ञानोबा बिरादार, बालाजी बिरादार, माधव बिरादार, हरी पांचाळ, अंगद बोयणे आदी ग्रामस्थ उपस्थित होते.
0 Comments