राष्ट्रसंत डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपूरकर लिंगैक्य
अखंड ऊर्जेचा स्रोत अनंतात विलीन;भक्तांवर शोककळा
अहमदपूर:(प्रतिनिधी) डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपुरकर हे मागील काही दिवसापासुन नांदेड येथील रुग्णालयात उपचार घेत होते आज दि.०१ सप्टेंबर रोजी दुपारच्या सुमारास त्यांचे देहावसान झाले असुन त्यांच्या भक्तांवर शोककळा पसरली आहे.
मागील काही दिवसापासुन डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपुरकर हे संजीवनी समाधी घेणार असल्याची अफवा पसरली होती त्यामुळे अहमदपुर येथील त्यांच्या भक्तीस्थळावर मोठया प्रमाणात एकच गर्दी झाली होती.
दरम्यान त्यांची तब्येत खालावल्याने त्यांना नांदेड येथील रुग्णालयात दाखल केले होते. महाराजांची काल पासुन प्रकृती चिंताजनक होती अखेर आज त्यांची प्राणज्योत मावळली. महाराष्ट्रासह अनेक राज्यात त्यांचा मोठा भक्त वर्ग असुन त्यांच्या भक्तासांठी मोठा धक्का मानला जात आहे.
डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपुरकर यांना अनेक राजकीय, सामाजिक पदाधिकाऱ्यांनी भारतरत्न दयावे अशी मागणी केली होती. तर अहमदपुर येथील त्यांच्या भक्तीस्थळास नव्यानेच त्यांच्या संमतीने ट्रस्टी नेमण्यात आले होते. अखेरचा श्वास घेताना महाराजांचे वय १०४ होते. डाॅ शिवलिंग शिवाचार्य महाराजांचे अध्यात्माबरोबर सामाजिक क्षेत्रात दिलेले योगदान हे अत्यंत मोलाचे आहे. स्वातंत्र्य पूर्व व स्वातंत्र्योत्तर काळ अनुभवत समाजाला विवेक देण्याचे खऱ्या अर्थानी त्यांनी कार्य केले आहे. डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराजांचे महाराष्ट्र, तेलंगणा, कर्नाटक, आंध्र प्रदेशात लाखो शिष्य मंडळी आहे.
0 Comments