Latest News

6/recent/ticker-posts

चाकुर तालुक्यातील शेतकऱ्यांवर दुहेरी संकट पावसाने मुग गेले मोड फुटुन,सोयाबीन वर बुरशी व करप्या सदृश्य रोगाचा प्रादुर्भाव 

चाकुर तालुक्यातील शेतकऱ्यांवर दुहेरी संकट पावसाने मुग गेले मोड फुटुन,सोयाबीन वर बुरशी व करप्या सदृश्य रोगाचा प्रादुर्भाव 



मागील रिपरिप पाऊसांपुळे मुगाला मोड फुटुन मुग गेला.त्यांचा पाऊसात शेतकरी चिंताग्रस्त झाला होता.सोयाबीन पिकांवर शेतकरी तग धरुन होता.पण सोयाबीन पिकांवर बुरशी व करप्पा रोगा पडल्यामुळे शेतकऱ्यांना मोठे आर्थिक नुकसान सोसावे लागणार आहे.बुरशी रोगांमुळे सोयाबीन पिक पिवळे पडु लागले आहेत.शेतकरी वर्गातुन अशी मागणी होत आहे की सोयाबीन पिकांचे पंचनामे करुन नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना आर्थिक मदत घ्यावी.


चाकुर:(ता.प्र.सलीमभाई तांबोळी) खरीप हंगामाची पेरणी यंदा मृगनक्षञामध्ये झाली.कोरोना विषाणुचां प्रादुर्भाव असताना सुध्दा शेतकऱ्यांनी शेतीची मशागत वेळेवर केली.शेतकऱ्यांना यावर्षी तरी निसर्ग सात देईल अशी आशाबाळगुन शेतकरी होता.पण दरवर्षी प्रमाणे यंदाही मुग पिकांचे अतोनात नुकसान झाले.पुन्हा शेतकरी निसर्गापुढे हतबल झाला.


पावसाने हाती आलेले मुग गेले मोड फुटुन नगदीचे पिक म्हणून शेतकरी सोयाबीन जास्त प्रमाणात पेरतो.आता सोयाबीन वर बुरशीजन्य व करप्या सदृश्य रोग पडलाय यामुळे शेतकऱ्यांवर दुहेरी संकट ओढवले आहे.अगोदर चार महिने लॉकडाऊन व नंतर अनलॉक यामुळे शेतकऱ्यांना आपली पेरणी करण्यासाठी बँकेचे हेलपाट मारावे लागले.पिककर्जासाठी शेतकऱ्यांना बँकेसमोर दिवसभर रांगेत उभा राहावे लागले.पैसे मिळाल्यानंतर बी बियाणे घेऊन पेरणी केली.डोक्यावर अगोदरच कर्जाच डोंगर आहे.ते कर्ज कसे फेडावे यांची चिंता शेतकरी वर्गाला आहे.पिक होते जोमात पण पावसामुळे गेले कोमात अशी अवस्था शेतकरी राजाची झाली आहे. तसेच सोयाबीन वर अळीचा प्रादुर्भाव आहे.यामुळे शेतकरी म्हणत आहे.पुर्वीची म्हण खरी ठरते की काय रास पदरात पडली तरी घरी आल्याशिवाय खरं न्हाय.सोयाबीनच्या शेंगा गळुन पडत आहेत.आळ्यांनी तर सर्वच पाला खाल्ला आहे.यावर्षी वेळेवर पाऊस पडल्याने पिके जोमात आली होती.माञ बुरशीजन्य व करप्या रोगांने सडा पडलेला दिसत आहे.मुग वेचुन घरी नेहण्या अगोदर पावसांने मोड फुटुन नुकसान झाले आहे.आता सोयाबीन ही हाताचे आलेले जाणार यामुळे शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे.शेतकरी नगदीचे पिक सोयाबीन जर रोगांमुळे कमी उत्पन्न झाले तर शेतकऱ्यांवर उपासमारीची वेळ येईल अशा चिंताग्रस्त मनस्थित सध्या शेतकरी आहे.


Post a Comment

0 Comments