मुगांव येथे माँ.जिजाऊ जयंती उत्साहात
निटूर:(प्रतिनिधी) दि.१२ जानेवारी हा राजमाता जिजाऊ जयंतीदिन निलंगा तालुक्यातील मुगांव येथे मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. या जयंती दिनानिमित्त छत्रपती शिवाजी महाराज चौकात माँ.जिजाऊ यांच्या तैलचिञास पुष्पहार अर्पण करून राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेचे पूजन करून मुजावर राजबब्बर दाउतसाहब यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले यावेळी उद्धव जाधव, महेश वाडीकर, विशाल राजूरकर, विठ्ठल रकटाटे, विशालबापू वाडीकर,अनिकेत वाडीकर, अजित तरगे,सुनिल कोळेकर आणि ग्रामस्थ व शिवभक्त उपस्थित होते.
0 Comments