Latest News

6/recent/ticker-posts

ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक निमित्त जिल्हयात मद्य विक्री बंद

ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक निमित्त जिल्हयात मद्य विक्री बंद 


लातूर
:(जिमाका) दि. - 13 जिल्हयात ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक 2021 चा कार्यक्रम घोषित करण्यात आला असून लातूर जिल्हयात दिनांक 15 जानेवारी 2021 रोजी मतदान तसेच दिनांक 18 जानेवारी 2021 रोजी मतमोजणी होणार आहे. या निवडणूक खुल्या, मुक्त तसेच निर्भय वातावरणात, शांततेत पार पाडणेस अनुसरुन प्रभागातील सर्व अबकारी अनुज्ञप्त्या बंद ठेवणे आवश्यक आहे.जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी. यांनी लोकप्रतिनिधीत्व अधिनियम 1951 च्या कलम 135 (सी) तसेच मुंबई मद्य निशेष कायदा 1949 चे कलम 142 नुसार तसेच नमुद कायद्यांतर्गत केलेल्या विविध नियमानुसार प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करुन पूढील नमूद केले नुसार संपूर्ण लातूर जिल्हयाच्या सर्व अबकारी अनुज्ञप्ती बंद ठेवण्याचे आदेश जारी केले आहेत. अनुज्ञप्ती बंद ठेवावयाची तारीख व बंद ठेवावयचा कालावधी- दिनांक 13 जानेवारी 2021, मतदान संपण्यापूर्वी 48 तास आधी म्हणजे सायंकाळ 6.00 वाजेपर्यंत. दिनांक 14 जानेवारी 2021 मतदानाच्या पूर्वीचा दिवस- संपूर्ण दिवस. दिनांक 15 जानेवारी 2021 मतदानाचा दिवस- मतदान संपेपर्यंत व दिनांक 18 जानेवारी 2021 मतमोजणी संपेपर्यंत राहील. या आदेशाची लातूर जिल्हयातील सर्व अबकारी अनुज्ञप्तीधारकांनी नोंद घ्यावी.  जे अनुज्ञप्तीधारक या आदेशाची अंमलबजावणी करण्यास कुचराई करतील त्यांच्या विरुध्द मुंबई दारुबंदी कायदा 1949 चे कलम 54 (1) (सी) नुसार आवश्यक कार्यवाही करण्यात येईल याची नोंद घ्यावी.

Post a Comment

0 Comments