क्रीडा पुरस्कार सुधारीत नियमावलीसाठी सुचना अभिप्राय पाठवावेत
लातूर:(जिमाका) दि. - 13 राज्य क्रीडा पुरस्कार प्रतीवर्षी शिवछत्रपती जीनवन गौरव पुरस्कार, उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक / जिजामाता पुरस्कार, शिवछत्रपती खेळाडू / साहसी / दिव्यांग खेळाडू पुरसकार देण्यात येतात. याबाबतची नियमावली शासन निर्णया नुसार निर्गमित केलेली आहे. या नियमावलीमध्ये सुधारणा करण्याचे प्रस्तावित आहे. शिवछात्रपती पुरस्कार नियमावलीच्या सुधारणाबाबत खेळाडू, नागरिक, संघटना यांच्याकडून सूचना व अभिप्राय दि. 22 जानेवारी 2021 पर्यंत मागविण्यात येत आहेत. पुरस्काराच्या प्रस्तावित सुधारणा नियमावलीची प्रत क्रीडा विभागाच्या https://sports.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आलेली आहे. या पुरस्कार नियमावलीच्या प्रस्तावित सुधारणांबाबत खेळाडू, नागरिक, संघटना यांनी आपल्या सुचना / अभिप्राय dsysdesk14@gmail.com किंवा desk14.dsys-mh@gov.in या मेलवर 22 जानेवारी 2021 रोजी पर्यंत पाठवाव्यात असे आवाहन क्रीडा व युवक सेचालनालय, महाराष्ट्र राज्य यांचेमार्फत करण्यात येत आहे. अधिक माहितीसाठी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, विभागीय उपसंचालक कार्यालय अथवा क्रीडा व युवक सेवा संचालनालय, शिवछत्रपती क्रीडा संकुल, महाळुंगे, बालेवाडी, पुणे यांचेशी संपर्क साधावा असे आयुक्त,ओम प्रकाश बकोरिया यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे केले आहे.
0 Comments