कुमठेकर यांच्या 'अतीत कोण? मीच...' या पुस्तकाचे ऑनलाइन प्रकाशन
उदगीर:(प्रतिनिधी) येथील लेखक प्रसाद कुमठेकर यांच्या 'अतीत कोण? मीच...' या पुस्तकाचे रविवारी सुप्रसिद्ध अभ्यासक आणि ज्येष्ठ साहित्यीक नंदा खरे यांच्या हस्ते फेसबूक लाईव कार्यक्रमात प्रकाशन करण्यात आले. बगळा आणि बारकूल्या बारकूल्या ष्टोऱ्या या दोन पुस्तकांनंतर प्रसाद कुमठेकरांचं हे तीसरं पुस्तक पार पब्लीकेशन, मुंबई यांच्याद्वारे प्रकाशीत करण्यात आले. यावेळी संवाद साधतांना 'आज माणसं जशी भाषा वापरतात तशी भाषा प्रसादच्या तिन्ही पुस्तकात वापरली आहे. रोजच्या व्यवहारात बोलल्या जाणाऱ्या भाषेची नाडी पकडण्यात प्रसादला यश मिळालंय' असं निरीक्षण नंदा खरे यांनी यावेळी नोंदवलं. ते पूढे म्हणाले, 'जे आपल्याला माहीत आहे किंवा ज्ञात आहे, त्याच्या पलिकडे जाण्याचा माणसाचा सतत प्रयत्न असतो. मी कोण यापेक्षा 'मी कुणाचा?' हा प्रश्न जास्त महत्वाचा आहे आणि याचं भान प्रसादच्या या पुस्तकातून वाचकाला येतं.' यावेळी प्रसाद कुमठेकर यांनी लेखकाचे मनोगत व्यक्त केले तर पार पब्लीकेशनच्या महेशलीला पंडित यानी प्रकाशकीय भुमीकेची मांडणी केली. इग्नेशियस डायस यांनी कार्यक्रमाचे सुत्रसंचालन केले.
0 Comments