शेडोळ येथे सात वर्षाच्या चिमुरडीवर अत्याचार;निलंगा तालुक्यातील संतापजनक घटना
निलंगा:(तालुका प्रतिनिधी/इरफान शेख) तालुक्यातील शेडोळ येथे सात वर्षीय मुलीवर गावातील एका पंचवीस वर्षीय इसमाने चॉकलेटचे आमिष दाखवून घराच्या पाठीमागे नेऊन अत्याचार केल्याची घटना घडली असून याबाबत निलंगा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सविस्तर व्रत असे की दि. 6 मंगळवार रोजी दुपारी 3:00 च्या सुमारास निलंगा तालुक्यातील शेडोळ येथील एका पंचवीस वर्षीय इसमाने घराजवळ असलेल्या दर्ग्यात खेळत असताना सदरील सात वर्षीय लहान मुलीला चॉकलेट देतो म्हणून दर्ग्याच्या पाठीमागे असलेल्या खुल्या जागेत नेऊन तिच्यावर अतिप्रसंग केला. सदरील लहान मुलगी ओरडत असताना तीला धमकी देत घरात कोणालाही सांगू नको म्हणून त्या नराधमाने तेथून पळ काढला. त्यानंतर मुलीच्या वडील व आईने निलंगा पोलिस ठाणे गाठले व त्या नराधमावर अत्याचार प्रकरणी व अॕट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. सदरील आरोपी हा फरार असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत. सदरील आरोपी विरोधात कलम गु.र.न.92/2021 कलम 376 ए ,बी,377,504,506. भादवी सह कलम 4(2),7.,8,12बाल लैंगिक अप्रका.2012 कलम 3 (आय)अनु.जा.ज.अ.प्र.कायदा अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास उपविभागीय अधिकारी दिनेशकुमार कोल्हे हे करत आहेत.

0 Comments