वैजनाथ सुशिलाबाई संभाजी जाधव याची संभाजी ब्रिगेडच्या विभागीय कार्याध्यक्षपदी निवड
लातूर:(जिल्हा प्रतिनिधी/बी डी उबाळे) दि. ७ - वैजनाथ सुशिलाबाई संभाजी जाधव याची संभाजी ब्रिगेड, लातुर विभागीय कार्याध्यक्ष पदी निवड झाल्याचे नियुक्ती पत्र देण्यात आले. (लातुर-बीड-उस्मानाबाद) संभाजी बिग्रेड या वैचारिक, सामाजिक व राजकीय चळवळीसाठी आपण श्रम, वेळ, बुद्धी, कौशल्य व पैसा हे पंचदान देऊन संघटनेत सातत्याने कार्यरत आहात. आपल्या या कार्याची दखल घेऊन आपली नियुक्ती करण्यात येत आहे. आपल्या विचार कार्यावातून पक्ष-संघटन व समाज-संघटन वळकट होईल, महामानवाच्या विचाराची समतावादी व्यवस्था निर्माण होण्यासाठी आपले योगदान महत्वाचे ठरणार आहे. या निवडी बद्दल उमाकां उफाडे, के.वाय.पटवेकर, किशोर शिंदे, अशोक सोमासे, शिरीष ढवळे, राम जगदाळे, अमोल अदमाने, मनोज तिवारी संतोष भाडुळे आदी सह मित्रपरिवारतून अभिनंदन होत आहे.

0 Comments