एकंबी ता. औसा येथे सात वर्षाच्या मुलीवर पन्नास वर्षाच्या नराधामकडून अत्याचार;औसा तालुक्यातील संतापजनक घटना
लातूर:(जिल्हा प्रतिनिधी-बी डी उबाळे) औसा तालुक्यातील एकांबी ता. औसा येथे सात वर्षीय मुलीवर गावातील अंदाजे 50 वर्षीय इसमाने जीवे मारण्याची धमकी देत आत्याचार केला. याबाबत भादा पोलीसाकडून मिळालेली माहिती अशी की,रविवार दि 4 एप्रिल 2021 रोजी सदरील आरोपीने एका सात वर्षीय मुलीस स्वतःच्या शेतामध्ये नेऊन तिच्यावर अनैसर्गिक आत्याचार केल्यामुळे आरोपी विरुद्ध गु.र.न.41/2021 कलम 376(a)(b)363,323 भादवी सह कलम 3(5)4(2) नुसार बाल लैंगिक अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला असून आरोपीस अटक करण्यात आली आसून पुढील तपास भादा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नाना लिंगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक महेश मुळीक करीत आहेत.

0 Comments