माजी सैनिक श्रीरंग कदम यांचे दुःखद निधन
शिरोळ(वां.): दि०६ - येथील रहिवाशी असलेले श्रीरंग सोनबा कदम यांच आज सकाळी ७:१० वा च्या सुमारास मृत्यू झाला. मृत्यू समयी ते ९० वर्षाचे होते त्यांच्या निधनाने शिरोळ(वा) गाव व परिसरात शोककळा पसरली आहे. दरम्यान श्रीरंग कदम हे भारतीय सैन्यदलात तब्बल १० वर्ष सेवा करून १९७३ साली सेवानिवृत्त झाले होते. मंगळवारी सकाळी अचानक कदम यांची प्रकृती बिघडली आणि काही क्षणातच त्यांची प्राणज्योत मावळली. त्यांच्या पच्यात दोन मुले एक मुलगी सुना नातवंडे पतवंडे असा परिवार आहे. त्यांच्या अशा प्रकारच्या निधनामुळे गावांत शोककळा पसरली असून, येथील स्मशानभुमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

0 Comments