निलंगा येथील स्थानिक प्रशासनाने केलेल्या पंधरा मिनिटात निलंगा बंद; व्यापारात उडाला गोंधळ
निलंगा:(तालुका प्रतिनिधी/इरफान शेख) जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश येताच आज निलंगा शहरात दुपारी दोन वाजल्यापासून प्रशासनातील अधिकाऱ्यांनी व्यापार बंद केला. अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व सेवा बंद करण्याचे आदेश अचानक आल्यामुळे निलंगा शहरातील व्यापारी संभ्रमावस्थेत होते. प्रत्येक व्यापारी एकमेकांना फोन करून व्यापार चालू ठेवायचा का बंद याबाबत चर्चा करत होता. त्यानंतर तहसीलदार, उपविभागीय अधिकारी, मुख्याधिकारी निलंगा यांच्याशी फोनवर संपर्क करून व्यापाराबद्दल माहिती मागितली असता सदरील अधिकारी हे दुपारी दोन वाजेपर्यंत जिल्हाधिकारी सोबत व्हिडीओ कॉन्फरन्सिंग वर असल्यामुळे तीन ते चार तास निलंगा शहरात व्यापारा बाबत संभ्रम होता.
तर अचानक दुपारी दोन वाजता प्रशासनातील अधिकारी अनाउन्समेंट करत पंधरा मिनिटांमध्ये दुकाने बंद करा अन्यथा आपल्यावर कारवाई करण्यात येईल, दंड आकारण्यात येईल असा सज्जड दम देताच अत्यावश्यक सेवा वगळता सर्वच शहरातील व्यापाऱ्यांनी आपला व्यापार तात्काळ बंद केला. मात्र शहरातील व्यापारी शासनाने या घेतलेल्या अचानक निर्णयामुळे संताप व्यक्त करीत आज सायंकाळी सात वाजता निलंगा विधानसभेचे आमदार तथा माजी पालकमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्याशी भेट घेतली व निवेदन देण्यात आले. अगोदरच गेल्यावर्षीपासून व्यापार बंद असल्यामुळे दुकानचे भाडे, कामगारांचे पगार, लाईट बिल, बँकेचे हप्ते, जीएसटी भरणा, आयटी रिटर्न, कौटुंबिक खर्च भागवायचा कसा त्यासाठी शासनाने आठवड्यातील चार दिवस व्यापार करण्यास परवानगी द्यावी या मागणीसाठी निवेदन देण्यात आले. तसेच हे निवेदन माननीय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे व जिल्हाधिकारी लातूर यांनाही देण्यात आले यावेळी शहरातील बहुतांशी व्यापारी उपस्थित होते. आपण मुख्यमंत्र्यांशी बोलून याबाबत चर्चा करू व सर्वांच्या हिताचा निर्णय लवकरच घेण्यास शासनास भाग पाडू असे आश्वासन यावेळी संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी निलंगा शहरातील व्यापाऱ्यांना दिले.
0 Comments