भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती अध्यक्षपदी मिलिंद महालिंगे
चाकूर:(ता.प्र.सलीमभाई तांबोळी) भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३० व्या सार्वजनिक जयंती महोत्सव समितीच्या अध्यक्षपदी प्रथम नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक मिलींद महालिंगे यांची सर्वानुमते निवड सोमवारी ५ एप्रिल रोजी करण्यात आली. चाकूर शहरातील वैशाली बुद्ध विहारात प्रा दिनेश काकनाटे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत जयंती महोत्सव समिती स्थापन करण्यात आली. या बैठकीत सलग साहाव्यांदा जयंती महोत्सव समितीच्या अध्यक्षपदी प्रथम नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक मिलिंद महालिंगे यांची अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे. यावेळी कार्यकारणीत उपाध्यक्ष सुर्यकांत कांबळे, सचिव पपन कांबळे,सहसचिव प्रभाकर गायकवाड,कोषाध्यक्ष बालाजी अडसूळ,मिरवणूक प्रमुख विक्की महालिंगे,वर्धमान कांबळे, चेतन महालिंगे यांची निवड करण्यात आली. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३० सार्वजनिक जयंती निमित्त कोरोनाचे नियम व अटीचे पालन करुन विविध कार्यक्रम व विविध सामाजिक उपक्रम घेण्याचे या बैठकीत ठरले आहे. या बैठकीस प्रा.वैजनाथ सुरनर,धर्मेद्र बोडके, नागशेन महालिंगे,बाबासाहेब कांबळे,करण महालिंगे, रुपेश सरवदे, समाधान कांबळे,सुरज उडाणशिव, सिंद्धार्थ गायकवाड, वैभव गायकवाड, अनिल सुर्यवंशी व सर्व पदाधिकारी,कार्येकर्ते,समाजबांधव उपस्थित होते.

0 Comments