प्रतिनिधी/द्रोणाचार्य कोळी
मदनसुरी: कासार शिरशी येथिल ग्रामीण रुग्णालयास भेट देऊन रुग्णांची संख्या, सोयी-सुविधा औषधोपचार याची पहाणी केली. रुग्णालयात असलेल्या रुग्णांची भेट घेऊन त्यांची विचारपूस करत त्यांना धीर दिला. तसेच प्रशासनाकडून करण्यात येत असलेल्या उपायोजनांचा संदर्भात अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेतली. ग्रामीण रुग्णालयास कायम स्टाफ ठेवावेत व तात्काळ जनरेटर उपलब्ध करून घ्यावे, तसेच महावितरणने 24 तास विज पुरवठा चालू ठेवावा अशा संबंधित अधिकारी वर्गास सुचना केल्या.
माझे कुटुंब माझी जबाबदारी ही मोहिम प्रत्येक गावात, नगरपालिका क्षेत्रात प्रभावी पणे राबवून घरोघरी जाऊन रुग्णांची माहिती घेण्यात यावी, यामुळे पहिल्याच स्टेज मध्ये रुग्णांवर उपचार करता येतील. कोरोना बाधितांच्या संपर्कातील लोकांच्या अधिकाधिक तपासण्या कराव्यात. होम आयसोलेशन शक्यतो टाळावे, शेपरेट घर, रूम असल्यास करावे, होम आयसोलेशन केलेले रुग्णांन कोरोना नियम पाळतात का ? हे गटविकास अधिकारी यांनी पाहावे ? पाळत नसल्याचे निदर्शनास आल्यास अशा रुग्णांवर सार्वजनिक ठिकाणी आढळल्यास कार्यवाही करावी. असे निर्देश पोलीस प्रशासनास दिले.
कोरोना संक्रमित रुग्णाची संख्या दिवसेंदिवस वाढत आहेत. केंद्र व राज्यसरकारच्या मार्गदर्शक नियमानुसार नागरिकांना व्हॅक्सीन लसदेण्याचा वेग वाढवावा. जास्तीत जास्त नागरिकांना लस देण्यात यावी अशा सुचना ता.आरोग्य अधिकारी यांना दिल्या. या कोरोना महामारीच्या काळात सर्व डॉक्टर्स, मेडिकल स्टाफ, नर्स तसेच अन्य सर्वांनीच आपला पूर्ण अनुभव पणाला लावून या आव्हानात्मक परिस्थितीचा सामना करणे आवश्यक आहे. तसेच कोरोना संक्रमन रुग्णांनी व नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी, घरात हि मास्क, सॅनिटायझरचा वापर करावा, नागरिकांनी घाबरून न जात प्रशासनामार्फत देण्यात येणाऱ्या सूचनांचे पालन करून सहकार्य करावे असे आवाहन केले. यावेळी शिवसेना समन्वयक किशोर जाधव, उपतालुका प्रमुख किशोर भोसले, तहसीलदार गणेश जाधव,गटविकास अधिकारी ताकभाते, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.परगे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.श्रीनिवास कदम, वैद्यकीय अधिकारी डॉ. वीर, डॉ विश्वेश कुलकर्णी, डॉ विलास पाटील, सपोनि रेवणनाथ डमाळे, पोलीस भीमाशंकर भोसले, आनंद गवळी महेश गरंडे, धनराज होळकुंदे, उपसरपंच बडेसाब लकडहारे, आदी संबंधित अधिकारी उपस्थित होते.
0 Comments