Latest News

6/recent/ticker-posts

लॉकडाऊन तरी दुकाने आॅन;चाकूर नगरपंचायतीची धडक कारवाई २७,०००/ रुपये दंड वसुल

लॉकडाऊन तरी दुकाने आॅन;चाकूर नगरपंचायतीची धडक कारवाई २७,०००/ रुपये दंड वसुल


चाकुर:{ता.प्र.सलीमभाई तांबोळी} चाकुर शहरात झपाट्याने कोरोनांचा प्रादुर्भाव वाढत आहे. जवळपास 244 च्या वर कोरोना बांधित रुग्णांची नोंद झाली आहे. प्रशासनाने आता कुठेतरी कडक पाऊल उचलने चालु केले आहे. महसुल विभाग, आरोग्य  विभाग, पोलीस प्रशासन, नगरपंचायत प्रशासनाने शहरात धडक मोहीम चालु केली आहे. शहरात जीवन आवश्यक दुकाने सोडुन दुसरेही कांही दुकाने लपुन चालु असल्याचे नगरपंचायत प्रशासनाच्या निदर्शनास आल्याने शहरात पथकांने फिरुन दंडात्माक कारवाई केली. किराणा दुकानातुन जनरल स्टोअर्सची विक्री, दारु विक्री, कापड दुकानातुन कपड्यांची विक्री, भाजी पाल्याच्या गाड्यावर स्टेशनरी माल विक्री अशा अनेक दुकांनदारा कडून नगरपंयाततीने जवळपास २७,०००/[सत्तावीस हजार रुपयांचा दंड वसुल केला] व एका दुकांनास सिल लावले सकाळी नागरिक बाजारपेठ खुप गर्दी करीत आहेत. शहरातील दोन तीन चौका तर तोबा गर्दीच गर्दी दिसुन येत आहे. विना मास्क फिरणार्या नागरिकांनाही दंड लागला आहे. नगरपंयायतीच्या वतीने या कारवाई मध्ये मुख्याधिकारी अजिक्य रणदिवे, अभियंता प्रमोद कास्टेवाड,कक्षाधिकारी भरतसिंह ठाकुर,बालाजी स्वामी, मुंकुद मस्के, प्रसन्ना चाकुरकर आदि कारवाई पथकात होते.

 चाकुर शहरात नगरपंचायत प्रशासनाच्या माध्यमातून शहरात कोरोनाचा अटकाव करण्यासाठी विविध उपाययोजना राबवले जात आहेत. नगरपंचायच्या वतीने शहरात पथक बनऊन त्या पथकांमार्फत काम केले जात आहे. नागरिकांनी शासनाच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे प्रशासन व नागरिकांच्या समन्वयातुन आपण कोरोना वर मात करु शहरात नियमांचे पालन न करणाऱ्या वर अशीच कारवाई चालु राहणार- अजिक्य रणदिवे,मुख्याधिकारी न.प.चाकुर

Post a Comment

0 Comments