Latest News

6/recent/ticker-posts

हलगर्जीपणा करणाऱ्या निलंगा येथील डॉक्टरावर निलंबनाची कार्यवाही.

हलगर्जीपणा करणाऱ्या निलंगा येथील डॉक्टरावर निलंबनाची कार्यवाही


बी जी शेख

निलंगा: डॉ . दिनकर एम पाटील , वैद्यकीय अधिकारी गट- अ वर्ग -२ उपिजल्हा रुग्णालय निलंगा ता . निलंगा जि . लातूर हे कोव्हीड-१९ सारख्या संवेदनशिल कार्यात निष्काळजीपणा, कामात टाळाटाळ करणे, वरिष्ठांच्या आदेशाचे पालन न करणे, उपजिल्हा रुग्णालयातील भरती रुग्णांना औषधी उपलब्ध असून सुध्दा बाहेरुन आणण्यास सांगणे, रुग्णांची आर्थिक फसवणूक करणे, कोव्हीड-१९ सारख्या महामारीच्या कामकाजात कुचराई करणे इत्यादी स्वरुपाचे शासकीय अधिकाऱ्यास अशोभनिय असे वर्तण करुनं महाराष्ट्र नागरी सेवा ( वर्तणुक ) नियम १९७९ चे नियम ३ चा भंग केल्याचे तहसीलदार, निलंगा यांचे संदर्भ क्र. १ अन्वये सादर केलेल्या अहवालावरुन प्रथम दर्शनी स्पष्ट झाले असून ही अतिश्य गंभीर बाब आहे. त्यामुळे संबंधित अधिकारी यांनी कोव्हीड-१९ ( महामारी ) या आपत्कालीन परिस्थितीत कर्तव्यामध्ये कसुर केल्यामुळे त्यांचे विरुध्द आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ आणि साथरोग प्रतिबंधात्मक कायदा , १८९७ अन्वये निलंबानाची कारवाई करणे आवश्यक असल्याची खात्री झाली आहे . त्याअर्थी , जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी , जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण लातूर आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ आणि साथरोग प्रतिबंधात्मक कायदा , १८९७ अन्वये मला प्राप्त झालेल्या अधिकाराचा वापर करुन संदर्भ क्र . १ च्या अहवालास अनुसरुन डॉ. दिनकर एम पाटील , वैद्यकीय अधिकारी गट अ वर्ग -२ उपिजल्हा रुग्णालय निलंगा ता. निलंगा जि. लातूर यांना आजच्या आदेशाच्या दिनांकापासून शासकीय सेवेतून निलंबित करण्याचे आदेश देत आहे. जिल्हा शल्य चिकित्सक यांनी संबंधित अधिकारी यांचेवर निलंबनाची रितसर कारवाई करुन अनुपालन अहवाल आजच या कार्यालयास सादर करावा . तसेच संदर्भ क्र.१ च्या अहवालनुसार सखोल चौकशी करुन त्यामध्ये दोषी आढळल्यास संबंधितावर आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ अन्वये व साथरोग प्रतिबंधात्मक कायदा , १८९७ नुसार कारवाई करावी. सदर आदेशाची तात्काळ अंमलबजावणी करुन अनुपालन अहवाल सादर करावा असे आदेश जिल्हाधिकारी लातुर यांनी दिले आहेत.

Post a Comment

0 Comments