Latest News

6/recent/ticker-posts

स्वतःचे दु:ख बाजूला ठेवून किशोर करत आहेत रुग्णांच्या जेवणाची व्यवस्था.

स्वतःचे दु:ख बाजूला ठेवून किशोर करत आहेत रुग्णांच्या जेवणाची व्यवस्था.


निलंगा:(तालुका प्रतिनिधी/इरफान शेख )दि.२८ - रामनवमी पासून "अक्का फाउंडेशन" तर्फे उपजिल्हा रुग्णालय, निलंगा येथे कोरोना रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना थोडासा आधार म्हणून जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे. माजी मंत्री व आ.संभाजीराव पाटील निलंगेकर व युवा नेते अरविंद पाटील निलंगेकर यांचे विश्वासू सहकारी किशोरजी जाधव यांचे वडील कै.प्रकाश जाधव (बापू)  यांचे नुकतेच कोरोनामुळे निधन झाले. या घटनेस अजून १३ दिवसही पूर्ण झालेले नसताना ते स्वतःहून पुढाकार घेऊन मदत करीत आहेत. त्यांच्यातील सामाजिक उत्तरदायित्वाच्या भावनेचे खरोखर कौतुक वाटते. किशोर जाधव म्हणाले कै.बापु गेल्याच दुःख तर फार झालं, पण मी जे तीन दिवस ग्रामीण रुग्णालयात काढले त्यात पेंशनट व नातेवाईक यांची हाल मनस्थितीत पाहुन मन पूर्ण हेलावून गेलं, अरविंद भाऊंना या गोष्टी सांगितल्या त्यांनी जबाबदारी दिली पण नियतीला वेगळंच घडवायचं होत. किशोर जाधव यांना असह्य वेदना असताना सुद्धा ते दुःख बाजूला ठेहून समाजकार्य करत आहेत त्यांचे कौतुक करावे तेवढे कमी आहे या संकट काळात ज्यांना शक्य होईल त्यांनी त्यापरीने सहकार्य करावे.

Post a Comment

0 Comments