औसा तालुक्यात निसर्गाचा झाला कोप,मेहनतीचे वार्षीक उत्पन्न झाले लोप,आंबा उत्पादक शेतकऱ्याची उडाली झोप.
बी डी उबाळे
औसा: दि.२८ - तालुक्यात निसर्गाचा झाला कोप म्हणल्यासारखे झाले असून शेतकऱ्याने लागवड केलेली आंबा बाग मोठ्याप्रमाणात वादळाने साफ झाली आहे.यामुळे शेतकऱ्याचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. औसा तालुक्यातील भादा व परिसरात मंगळवार दि 27 एप्रिल रोजी रात्री 6 वाजले पासून बुधवार दि 28 एप्रिल 2021 रोजी सकाळी 7 वाजेपर्यंत सतत हवा सुटल्याने प्रत्येक झाडाच्या आंब्याचा पाऊस पडल्यासारखे दिसत होते.भादा तालुका औसा येथील शेतकरी दयानंद काशिनाथ माळी यांनी सर्वे नंबर 306 ब मध्ये एक हेक्टर केशर आंबा लागवड केली असून संपूर्ण बाग वादळी वाऱ्याने भुईसपाट झाली असून मोठ्या प्रमाणात आंबा गळती होऊन शेतकऱ्यांची मोठी आर्थिक नुकसान झाले आहे. या केशरबाग आंब्याचा जनरल विमाही उतरला असून एचडीएफसी उतरला असून एचडीएफसी या कंपनीचा विमा जोखीम असून ही कंपनी शेतकर्यांना वेळेवर नुकसान भरपाई देईल की नाही?अशी शंका शेतकऱ्यांनी व्यक्त केली. सदरील बागेचा पंचनामा भादा सज्जाचे तलाठी राम दूधभाते यांनी केला यांनी केला असून प्रशासकीय स्तरावर मदत मिळविण्यासाठी ते सदैव शेतकऱ्यांच्या पाठीशी पाठीशी आहेत असे त्यांनी सांगितले.
【 】भादा कृषी सहाय्यक परमेश्वर लोखंडे यांच्याशी संपर्क साधला असता सदरील बागेवर विमा उतरविला असून विमा कंपनी त्यांना सॅटेलाईटद्वारे हवेचा वेग चेक करून कोणत्या प्रमाणात किती नुकसान झाले नुकसान हवेचा वेग चेक करून कोणत्या प्रमाणात किती नुकसान झाले नुकसान झाले याचे मोजमाप करून सदरील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळणार असल्याची खात्री त्यांनी व्यक्त केली.
【 】मी एक हेक्टर आंबा केशर बाग लागवड केली असून फक्त आंबा उत्पादन घेतो यामुळे यावर्षी 5 लाख रु उत्पन्न अपेक्षीत होते परंतु या अचानक वादळ वाऱ्यामुळे बागेचे 60% नुकसान झाले असल्याचे शेतकरी दयानंद माळी यांनी सांगितले.

0 Comments