Latest News

6/recent/ticker-posts

कोरोना आजारातून बरे झालेल्या रुग्णांना व नातेवाईकांना झाडे देऊन शुभेच्छा

कोरोना आजारातून बरे झालेल्या रुग्णांना व नातेवाईकांना झाडे देऊन शुभेच्छा


बी जी शेख 

लातूर:कोरोना सारखा गंभीर आजार हा सर्वांना ऑक्सिजन आणि झाडांचं महत्त्व सांगून गेला निसर्गाकडून  विनामूल्य मिळणाऱ्या ऑक्सिजनची कोणालाही पर्वा नव्हती पण त्याच ऑक्सिजनची ज्यावेळी कमतरता भासली, ऑक्सिजन अभावी रुग्णांचे मृत्यू झाले त्यावेळेस झाडांपासून मोफत मिळणाऱ्या ऑक्सिजन चे महत्व सर्वाना कळाले. या आजारातून सुखरूप बाहेर पडलेल्या रुग्णांना विनामूल्य ऑक्सिजन देणारी झाडे वितरित करण्याचा उपक्रम सुरू केला. लातूर ग्रामीणचे आमदार धीरज देशमुख यांच्या हस्ते विवेकानंद रुग्णालयाच्या कोव्हीड सेंटर मधील रुग्णांना  कडुनिंबाची मोठी झाडे व शक्तिवर्धक सुकामेवा वितरित करण्यात आले. रुगणांनी, नातेवाईकांनी ही झाडे  लावावी, जपावी, निसर्ग संवर्धन करावे, लातूरचे हरित आच्छादन वाढावे असे आवाहन आमदार धिरजजी देशमुख यांनी केले. अशा उपक्रमामार्फत इतरांनाही निसर्गाच्या नि:स्वार्थ भावनेची जान होईल असे मत मनपा आयुक्त अमन मित्तल यांनी व्यक्त केले. कोव्हीड मुक्त झालेल्या सर्व रुग्णांना झाडे देऊन झाडे लावण्याचे आवाहन केले जाईल, एक हजार झाडे वितरित केली जातील असे आश्वासन आयएमए अध्यक्ष डॉ. सुरेखा काळे यांनी दिले. ग्रीन लातूर वृक्ष टीमचे डॉ पवन लड्डा यांनी कडुनिंबाच्या झाडाचे महत्व विशद करून प्रत्येकांनी आपल्या घर परिसरात एक कडुनिंबाचे झाड़ लावावे व निरोगी राहावे असे आवाहन केले. लातूर शहरात गत ६९८ दिवसात ५५ हजार झाडे लावून त्यांचे टँकरद्वारे पाणी देऊन ग्रीन लातूर वृक्ष टीम संगोपन करत आहे अशी माहिती नगरसेवक इम्रान सय्यद यांनी दिली. यावेळी लातूर महानगरपालिका चे आयुक्त अमन मित्तल, विवेकानंद रुग्णालयाचे अध्यक्ष डॉ. अरुणा देवधर, डॉ. राधेश्याम कुळकर्णी, आयएमए लातूर अध्यक्ष डॉ. सुरेखा काळे, सचिव डॉ. हनुमंत किनीकर, डॉ. कल्याण बरमदे, डॉ. कल्पना किनीकर, ग्रीन लातूर वृक्ष टीमचे डॉ. पवन लड्डा, मनपा नगरसेवक इम्रान सय्यद, सुलेखा कारेपुरकर, प्रमोद निपाणीकर, मनमोहन डागा, महेश गेलडा, प्रिया नाईक, अरीफ सय्यद,शेख फारूक, विजयकुमार कठारे हे उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments