निलंगा उपजिल्हारुग्णालयतील व्हेंटिलेटरवरील रुग्ण रामभरोसे;त्वरित तज्ञ डॉक्टर द्या,मनसेची जिल्हाशल्यचिकित्सकांकडे मागण
निलंगा: येथील मेडिकल वर तहसीलदारांनी टाकलेल्या धाडी नंतर उपजिल्हारुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ पाटील हे निलंबित झाले आहेत.आज या रुग्णालयात सात रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत व 43 रुग्ण ऑक्सिजन वर आहेत.परंतु व्हेंटिलेटर ऑपरेट करणारे तज्ञ तेच असल्यामुळे हे सात रुग्ण आजघडीला रामभरोसे आहेत.ते कुठल्याही क्षणी मृत्यू पावू शकतात.मग याचे जिमेदार कोण? कारण दुसऱ्या कुठल्याही वैद्यकीय अधिकाऱ्यांना व्हेंटिलेटर ऑपरेट करता येत नाही.अश्यातच नवीन रुग्ण व्हेंटिलेटरवर घेण्याची गरज पडली तर करायचे काय असा प्रश्न डॉक्टरांना पडला आहे.या मुळे मनसे जिल्हाध्यक्ष डॉ नरसिंह भिकाने यांनी जिल्हाशल्यचिकित्सक यांना भेटून ताबडतोब तज्ञ डॉक्टर देण्याविषयी मागणी केली.यावेळी जिल्हाउपाध्यक्ष शिवाजी भंडारे,तालुकाध्यक्ष सूरज पटेल,अबू बकर सय्यद आदी उपस्थित होते.
स्टंटबाजी पेक्षा व्हेंटिलेटरवरील रुग्णांचे जीव महत्वाचे- डॉ भिकाने
तहसीलदारा यांच्या डॉक्टर विषयीच्या धाडीनंतर महामारी मध्ये वर्षभर सेवा देणाऱ्या डॉक्टर व स्टाफ यांच्यासह उपजिल्हा रुग्णालयाची जी बदनामी झाली आहे त्यामध्ये सतत चांगली सेवा देणारे वैद्यकीय अधीक्षक डॉ सौंदळे, डॉ साळुंके यांच्या सहित अतिशय कमी पगारावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचेही मनोबल खचले आहे,रुग्णांचा रुग्णालयावरील विश्वासाला तडा गेला आहे व सर्वात महत्वाचे म्हणजे आजघडीला तिथे तज्ञ डॉक्टर नसल्यामुळे व्हेंटिलेटरवरील रुग्णांचा जीव टांगणीला लागला आहे व नातेवाईक सैरभैर झाले आहेत असे डॉ भिकाणे उपजिल्हारुग्णालयाला दिलेल्या भेटी नंतर म्हणाले.स्टंटबाजी पेक्षा अंत्यवस्थ रुग्ण दगाऊ नये म्हणून पर्यायी तज्ञ डॉक्टर देने हे अत्यावश्यक असल्याचे प्रतिपादन डॉ भिकाणे केले.

0 Comments