Latest News

6/recent/ticker-posts

रेमडीसीवर इंजेक्शन ब्लॅक मध्ये विक्री करत असल्याच्या विरोधामध्ये राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने तहसीलदार देवणी मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन

रेमडीसीवर इंजेक्शन ब्लॅक मध्ये विक्री करत असल्याच्या विरोधामध्ये राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने तहसीलदार देवणी मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन

देवणी:(तालुका प्रतिनिधी/विक्रम गायकवाड) राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांना रेमडीसीवर इंजेक्शन ब्लॅक मध्ये विक्री करत असल्याच्या विरोधामध्ये राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने मुख्यमंत्र्यांना लेखी निवेदन देऊन संबंधित डॉक्टर, मेडिकल व मित्रटोळी वाल्या विरोधात तात्काळ कार्यवाही करण्यात यावे अशी मागणी राष्ट्रीय समाज पक्षाचे मराठवाडा संपर्कप्रमुख आनंद जीवणे उर्फ प्रथवीराज पाटील यांनी दिले आहे.      सद्या कोरोनाने हाहाकार माजवला असुन लातूर सह संपूर्न महाराष्ट्रात रेमडीसीवर इंजेक्शनचा प्रचंड प्रमाणात तुटवडा पडत असून सध्या काही डॉक्टर व काही मेडिकल वाले यांनी आपल्या संबंधित मित्रासोबत टोळी तयार करून या टोळीच्या मार्फत रेमडीसीवर इंजेक्शनचा आगाऊ रकमेने म्हणजेच १० ते १५ हजार रुपये एका इंजेक्शनला घेत आहेत हे प्रत्यक्ष  दर्शनी मी स्वतः माझे नातेवाईकाला उदगीर येथे अडमिट केले असता आमच्या नातेवाईकास रेमडीसीवर इंजेक्शन नसल्याचे सांगितले व तुमचे तुम्ही बाहेरून आणा असे आमच्या नातेवाईकास सांगितले आहे. नाविलाजास्तव बऱ्याच ठिकाणी विचारणा केली असता अवाच्या सवा भाव  रेमडीसीवर इंजेक्शनचा सांगत आहेत तरी नाविलाजाने आमच्या नातेवाईकांनी  रेमडीसीवर  इंजेक्शन पंधरा हजाराला घ्यावे लागले. याबाबत मी स्वतः तक्रारदार जिल्हा शल्य चिकित्सक, ड्रक्स  अधिकारी यांना विचारले असता वरूनच स्टॉक कमी आहे असे सांगण्यात आले.  काही डॉक्टर व मेडिकल वाले यांनी एक टोळी तयार करून टोळी मार्फत आगाऊ रकमेने इंजेक्शन विकली जात आहे. त्याचे मुख्यमंत्र्यांनी उच्चस्तरीय चौकशी करावी व दोशी डॉक्टर व मेडिकल वाले यांच्यावर योग्य ती कारवाई करावी व तसेच सक्रिय टोळी यांच्यावरती फौजदारी गुन्हे दाखल करावी असे आशियाचे निवेदन मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे  लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री अमित देशमुख  राज्यमंत्री संजय बनसोडे यांना निवेदनाद्वारे देऊन तात्काळ कारवाई करण्यात यावे अन्यथा लातूर सह संपूर्ण महाराष्ट्रात राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने  तीव्र आंदोलन करण्यात येईल याचे संबंधितांनी दखल घ्यावे असे लेखी निवेदन आनंद जीवणे उर्फ प्रथवीराज पाटील यांनी जिल्हाधिकारी लातुर व तहसीलदार देवणी यांच्या मार्फत मुख्यमंत्री यांना देण्यात आले आहे.



Post a Comment

0 Comments