Latest News

6/recent/ticker-posts

कोरोनाला हद्दपार करायचे असेल,तर लसीकरण करा;करीम गुळवे माजी सभापती प.स.चाकुर यांचे आहवान

कोरोनाला हद्दपार करायचे असेल,तर लसीकरण करा;करीम गुळवे माजी सभापती प.स.चाकुर यांचे आहवान


चाकुर:{ता.प्र.सलीमभाई तांबोळी} कोरोना लसीकरणांचा शरीरावर कोणताच दुष्परिणाम होत नाही.लस शंभर टक्के सुरक्षित आहे.लस घेताना मनात कोणताच गैरसमज आणु नका न घाबरता लसीकरण करा व कोरोनांचा नायनाट करण्यासाठी सर्वांनी लस घ्यावी असे आव्हान करीम गुळवे यांनी केले,आज ग्रामीण रुग्णालय चाकुर येथे जाऊन दुसऱ्या वेळी कोविशिल्ड ही कोरोना प्रतिबंधक लस घेतली दुसऱ्या टप्पायातील लसीकरणाला सुरुवात झाली.ही लस घेण्यास पाञ असलेल्या नागरिकांनी लस लवककरात लवकर घेऊन कोरोना विरूध्दच्या लढ्यात सहभाग घ्यावा.आज चाकुर शहरातील ग्रामीण रुग्णायलात दुसऱ्या लसीकरणांची सुरुवात झाली.यावेळी चाकुर तहसीलदार डॉ.शिवानंद बिडवे उपस्थित होते.शासनाच्या वतीने लसीकरण करण्यास भर देण्यात येत आहे.कोरोनावर नियंत्रण मिळवायचे असेल तर लसीकरण हाच उपाय आहे.चाकुर तालुक्यात व शहरात झपाट्याने कोरोनाचा शिरकाव होत आहे.शासन व प्रशासन आहोराञ कोरोना विरोधात लढाई लढत आहे.माझे कुटुंब माझी जबाबदारी अंर्तगत सर्वानी स्वतःसह कुटुंबातील वयोस्कर वयोगटातील व्यक्तीची काळजी घ्यावी.शासनाच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे.घरी राहा सुरक्षित राहा.सामाजिक अंतर ठेवा,हात साबणांने धुवा,मास्कचा वापर करा,लसीकरण करुन घ्यावे असे आव्हान त्यांनी केले.

Post a Comment

0 Comments