Latest News

6/recent/ticker-posts

16 कोरोना रुग्णाला केले कोरोना मुक्त, औसा ग्रामीण रुग्णालयात दिलासादायक कार्य

16 कोरोना रुग्णाला केले कोरोना मुक्त, औसा ग्रामीण रुग्णालयात दिलासादायक कार्य


बी जी शेख

औसा: सध्याला कोरोनाचा आजार रेमाडिसिव्हर इंजेक्शन, ऑक्सिजनचे बेड यावरून सर्वत्र चिंताजनक स्थिती असतानाच लातुर जिल्ह्यात दिलासादायक कार्य समोर आलंय रेमाडिसिव्हर इंजेक्शन शिवाय 16 अत्यवस्थ रुग्णाला कोरोना मुक्त करण्याचं कार्य डॉक्टर व अधिपरिचरिकांनी केले आहे यामुळे सर्वत्र कौतुक होत आहे. जिल्ह्यात दररोज किमान दीड हजारापेक्षा जास्त कोरोना रुग्ण वाढत असत त्यात डॉक्टरानी रेमाडिसिव्हर इंजेक्शनच दिलेलं प्रिस्क्रिप्शन व नातेवाइकांना होणार त्रास तर ऑक्सिजन बेड यामुळे रुग्ण व नातेवाइकांना मोठा आर्थिक व मानसिक त्रास सहन करावा लागला. जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी पी यांनी 16 एप्रिलला ग्रामीण रुग्णालयात ऑक्सिजन बेड तयार करून कोविड रुग्णालय सुरू केले औसा इथं आजपर्यंत 40 अत्यवस्थ रुग्ण दाखल झाले ज्यात अनेकांचा CT स्कॅनमध्ये काहींचा 20 पेक्षा जास्त स्कोअर होता वैद्यकीय अधीक्षक डॉ अंगद जाधव व डॉ आर आर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ सचितानंद रणदिवे व डॉ मनीष कसपटे, सुजाता वाघमारे, योगेश्वरी जाधव, सरिता उबाळे,प्रतिभा इगवे, अश्विनी पुराणिक या स्टाफने उत्तम कार्य केले आरोग्य विभागाने सूचित केलेल्या निकषांवर औषधोपचार करत आज 16 अत्यवस्थ रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत इथं कोरोना वार्डात काम करताना सुरुवातीला भीती वाटत होती पण या कामात समाधान मिळत असल्याचे नर्सेस सांगतात आहेत. औसा तालुक्यातील ग्रामीण भागातील अत्यवस्थ रुग्ण ऑक्सिजनवर ग्रामीण रुग्णालयात उपचार घेत आहेत त्याच्यावर रेमाडिसिव्हर शिवाय उपचार होत असून प्रकृती उत्तम होत आहे तर अनेकजण कोरोना मुक्त झाल्याने नातेवाईक समाधानी आहेत. शासकीय रुग्णालयात ज्या रुग्णाचा HRCT चा स्कोअर 20 पेक्षा जास्त असूनही रेमाडिसिव्हर शिवाय उपचार करून 16 रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत यामुळे ग्रामीण रूग्णालयातील डॉक्टर व त्याच्या पथकाच्या कार्याचे कौतुक केले जात आहे.

Post a Comment

0 Comments