लातूर तालुक्यातील गावांना उपविभागीय अधिकारी, तहसीलदार यांच्या भेटी आणि कोरोना नियंत्रणाबाबत मार्गदर्शन
बी डी उबाळे
लातूर: तालुक्यातील गंगापूर,वासनगाव, सावरगाव,एकुर्गा, निवळी व भोसा या ग्रामीण भागातील गावामध्ये उप विभागीय अधिकारी लातूर सुनील यादव व तहसीलदार स्वप्निल पवार यांनी सोमवार दि 26 एप्रिल 2021 रोजी भेटी देऊन प्रत्येक गावातील सरपंच- ग्रामसेवक, तलाठी-पोलीस पाटील,आशा कार्यकर्ती,अंगणवाडी सेविका यांच्या बैठका घेऊन त्यांना कोरोना नियंत्रणा बाबत मार्गदर्शन केले. तसेच गावातील कोरोना आजाराबाबतीतील अडचणी समजून घेतल्या.प्रत्येक गावातील कोरोना रुग्णांची होम आयसोलेशन सी सी सी केंद्रातील पेशंट यांचा आढावा घेऊन गावातील रुग्ण संख्या कमी होणे करीता सर्वांना उपाय योजना सांगितले, तसेच कोरोना नियमांचे काटेकोर अंमलबजावणी करण्याबाबत कडक सुचना दिल्या. तसेच मौजे गंगापूर व निवळी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रास भेटी देऊन तिथे चालू असलेल्या कोरोना लसीकरण व तपासणी ची पाहणी केली.गंगापूर येथील बैठकीत सरपंच बाबुराव खंदाडे यांनी फवारणी बाबतची अडचण मांडली ती सोडविण्यासाठी गट विकास अधिकारी यांनी सांगितले.मुरुड येथील सी सी सी केंद्राची पाहणी केली. सोबत गट विकास अधिकारी गोडभरले तालुका आरोग्य अधिकारी डॉ सारडा मंडळ अधिकारी संजय घाडगे हे होते.
0 Comments