नळेगाव येथे प्राथमिक आरोग्य केंद्रास जिल्हा परिषद अध्यक्षाकडून पाहणी
नळेगाव:{प्रतिनिधी/बाळासाहेब बरचे} कोरोनाचा वाढता प्रभाव पाहता नळेगाव ता.चाकूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रास कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी उपाययोजना करणे व लसीकरण संदर्भात जि.प.अध्यक्ष राहुल केंद्रे यांनी भेट देऊन आढावा घेतला व तसेच उपाययोजना सुचवून मार्गदर्शन केले. जिल्हा परिषद अध्यक्ष राहुल केंद्रे यांनी प्राथमिक आरोग्य केंद्रास भेट देऊन कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांची काटेकोरपणे अंमलबजावणी करणे संदर्भात सूचना केल्या.व सखोल आढावा घेत लसीकरणाबाबत माहिती घेतली. यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ राजकुमार टकटवळे यांनी कोरोना संदर्भात केलेल्या उपाययोजनांची माहिती दिली. आता पर्यंत नळेगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात 3200 नागरिकांना लसीकरण करण्यात आल्याचे सांगितले. यावेळी जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षा भारतबाई साळुंके,जिल्हा परिषद सदस्या धनश्री अर्जुने,भाजप ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष बापूसाहेब राठोड,चेअरमन दगडू साळुंके,भाजपा अनुसूचित जाती मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष प्रा .पंडित सूर्यवंशी,भाजपा जिल्हा सरचिटणीस बबन मुदाळे, भाजपा जिल्हाउपाध्यक्ष बिरादार,राजेश अर्जुने,सरपंच ताजोद्दीन घोरवाडे,ग्रामसेवक सुनील शिंगे,वैद्यकीय अधिकारी डॉ.राजकुमार टकटवळे,डॉ सुधीर चव्हाण,माजी पंचायत समिती सदस्य अनिल चव्हाण, ग्रा.प.सदस्य श्याम मुंजाने,उमाकांत सावंत,दगडू सावळकर,व तसेच राजकुमार सावंत,राजू शेलार,खुडबोद्दिन घोरवाडे आदी उपस्थित होते. यावेळी नळेगाव येथील अनिल चव्हाण मित्र मंडळातर्फे सर्व मान्यवरांचा covid-19 नियमाचे पालन करत सत्कार करण्यात आला. यावेळी पप्पु सावंत,जगदीश नळेगावकर,अमोल पांचाळ,शिवहार तोंडारे,विजय ढोबळे,कैलास सूर्यवंशी,प्रशांत फरकांडे आदींसह मित्र परिवार उपस्थित होता.

0 Comments