आनंदमुनी विद्यालयांमध्ये विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी
केळगाव:( प्रतिनिधी वसीम मुजावर ) निलंगा तालुक्यातील केळगाव येथील मोनी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात आज विश्वरत्न बोधिसत्व महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 130 वी जयंती साधेपणाने साजरी करण्यात आली यावेळी प्राचार्य सिद्राम मिटकरी यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आले यावेळी उपस्थित आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस विनम्र अभिवादन करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आत्मसात करून आपले आयुष्य घडवावे त्यांची प्रेरणा आपल्या जीवनात आणावी असे ऑनलाईन संदेशातून विद्यार्थ्यांना प्राचार्य सिद्राम मिटकरी यांनी मार्गदर्शन केले.
0 Comments