नळेगाव येथे अनिल चव्हाण यांचा वाढदिवस साजरा;500 आर्सेनिक अल्बम 30 गोळ्यांचे वाटप
नळेगाव:(प्रतिनिधी/बाळासाहेब बरचे) येथील सामाजिक कार्यकर्ते माजी पंचायत समिती सदस्य अनिल विश्वनाथ चव्हाण यांचा वाढदिवस दि 5 मे रोजी अनिल चव्हाण मित्र मंडळातर्फे साद्या पद्धतीने साजरा करण्यात आला. कोरोना संसर्गचा वाढता प्रभाव पाहता कोरोना संसर्ग होऊ नये यासाठी अनिल चव्हाण यांनी वाढदिवसानिमित्त एक सामाजिक उपक्रम म्हणून फ्रंट लाईन वर्कर म्हणून काम बघणारे प्राथमिक आरोग्य केंद्रातील आरोग्य कर्मचारी,पोलीस दुरक्षेत्र कार्यालय येथील पोलीस कर्मचारी,आशा कार्यकर्त्या व तसेच ग्रामपंचायत कर्मचारी याना (आर्सेनिक अल्बम 30) 500 गोळ्यांचे वाटप अनिल चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आरोग्य अधिकारी, आरोग्य कर्मचारी,आशा कार्यकर्त्या,पोलीस कर्मचारी गणेश बुजारे,अविनाश शिंदे,माजी उपसरपंच गृहशनेश्वर मलशेट्टे,ग्रा.पं. सदस्य उमाकांत सावंत,सतीश पांडे,सत्यवान सावंत,संतोष तेलंगे,राजू शेलार,सुनील भोसले आदी उपस्थित होते.
0 Comments