उपजिल्हा रुग्णालयातील कोविड योद्धाचा सोमाणी परिवार व मित्रमंडळ ठरताहेत आधार
निलंगा:(तालुका प्रतिनिधी/इरफान शेख) कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव व मूर्त्युचे प्रमाण वाढताना दिसत आहे सद्याची परिस्थिती खूप भयंकर निर्माण झाली आहे. सहाजिकच आरोग्य विभागावर कामाचा ताण खूप वाढलेला दिसत आहे. बाळू सोमाणी व बाळू मणियार व अनंत कारभारी व मित्रमंडळाने गेल्या वर्षी उपजिल्हा रुग्णालयात 21 पंखे व रुग्णांना व त्याच्या नातेवाईकांना जेवणाचे डब्बे, फळे, बिस्कीट, मास्क अश्या प्रकारची सेवा उपलब्ध करून दिली होती. यासेवेबद्दल रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ.दिलीप सौदळे यांनी सत्कार करून या उपक्रमाचे कौतुक केले होते. या वर्षीही बाळू सोमाणी, रंतीकांत अट्टल, सचिन राठी मागील काही दिवसापासून या परिस्थितीत कोविड योद्धाचा आधार ठरत आहेत रोज सायंकाळी 5:00 वाजता स्वतः बाळू सोमाणी येऊन चहा व बिस्कीट सर्व कर्मचारी व अधिकारी यांना देत आहेत व कोविड पॉझिटिव्ह रुग्णाला रुग्णालयात दाखल करणे, नातेवाईकाला व्यवस्थित सल्ला देणे कसल्याही प्रकारची कोवीड रुग्णाची व नातेवाईकांची काही अडचण असेल रुग्णालयात स्वतः बाळू सोमाणी जाऊन छोट्या-मोठ्या अडचणीला सदैव तत्पर आहे. याच पद्धतीने व्हाट्सअप ग्रुप मध्ये त्यांनी श्री शिवाजी विद्यालय या त्यांच्या शाळेच्या ग्रुप मध्ये सर्व ग्रुप मधील सदस्यांना विनंती करून निधी जमा करून रुग्णालयांमध्ये आरो फिल्टर वॉटर ची सोय केली व रुग्णालयात प्रेशर ऑक्सिजनचे बेड व्हावे म्हणून प्रयत्न करत आहेत. या उपक्रमाबद्दल सर्वच स्तरातून त्यांचा व त्यांच्या टीमचा कौतुकाचा वर्षाव होत आहे.
0 Comments