भाजप युवा नेते अरविंद पाटील निलंगेकर यांनी घेतलि निटूर येथे कोरोनाची पहिली लस
निटूर: भारतीय जनता पार्टीचे युवा नेते अरविंद पाटील निलंगेकर यांनी आज निलंगा तालुक्यातील निटुर येथे प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये जाऊन कोरोनाची पहिली लस घेतली आहे. व आरोग्य केंद्राची पाहणी करून काही अडचणी समस्या जाणून घेतल्या निटुर प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉ. श्रीनिवास मोरे दाम्पत्याने ग्रामीण भागात 5108 जनाचे लसीकरण केले आहे निलंगा तालुक्यातील सात आणि जिल्ह्यातील सेहेचाळीस आरोग्य केंद्रामध्ये त्यांनी सर्वाधिक वेगवान लसीकरण करण्याचा एक प्रकारे विक्रम केला आहे. डॉ. श्रीनिवास मोरे व त्यांच्या पत्नी डॉ. प्रतिक्षा पवार-मोरे हे दोघे खऱ्या अर्थाने आरोग्यदूत ठरले आहेत कोरोना विरुद्ध या लढाईत यांची योगदान कायम स्मरणात राहील असे वाक्य अरविंद पाटील निलंगेकर यांनी बोलून दाखवले यावेळी प्राथमिक आरोग्य केंद्र निटुर येथे चेअरमन दगडुजी साळुंके, तालुका आरोग्य अधिकारी श्रीनिवास कदम, पंचायत समिती सदस्य सहा निटुर येथील भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते उपस्थित होते.
0 Comments