Latest News

6/recent/ticker-posts

कोविड योद्धा मंगला शालगर यांचा सरपंच दिपाली पांचाळ यांच्या हस्ते सत्कार

कोविड योद्धा मंगला शालगर यांचा सरपंच दिपाली पांचाळ यांच्या हस्ते सत्कार


कासार शिरशी
:(प्रतिनिधी/फेरोज जागीरदार) कोरोनाच्या संकटकाळात स्वतःच्या जीवाची परवा न करता शहर व परिसरात कोरोना या आजाराविषयी जनजागृती करत लोकांना धीर देत जनजागृतीच्या महान कार्य सोबत स्वखर्चातून लोकांना मास्क चे वाटप करणे, नागरिकांना लसीकरण आस प्रवृत्त करणे गरज भासल्यास बाधितांच्या संपर्कात जाऊन त्यांची सेवा सुश्रुषा करणे यासह महिला मंडळाच्या माध्यमातून आशा कार्यकर्त्या,अंगणवाडी सेविकांच्या धरतीवर सामाजिक कार्य करणाऱ्या सखी मंगलाताई शालगर यांच्या कार्याची दखल घेत कासार शिरशी येथील महिला सरपंच सौ. दिपाली पांचाळ यांनी त्यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार केला. सध्याच्या काळात कोरोना च्या पार्श्वभूमीवर स्वखर्चाने मोफत मास्क चे वाटप करणे कोणाची भीती कमी करणे धीर देणे जनतेला लस घेण्यास प्रवृत्त करणे असे कार्य सध्या शालगर मॅडम करीत आहे इसवी सन 1990 पासून कस्तुरबा महिला मंडळाच्या माध्यमातून आज तागायत लातूरच्या ब्लॉक कॉर्नेटअंजना साबळे यांच्या नेतृत्वाखाली ते कार्यरत आहेत स्वयं शिक्षण प्रयोग व लातूर येथील संवाद सहाय्यक संघटने अंतर्गत शहर व परिसरात सहाशे गरजूंना गृह उपयोगी साहित्य त्यांनी मिळवून दिली अल्पभूधारक महिला शेतकऱ्यांना अन्नसुरक्षा योजनेचा लाभ मिळवून दिला व त्यांचे व्यवसाय वृद्धिंगत केले या त्यांच्या कार्याची दखल घेत येथील सरपंच दिपाली पांचाळ यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला याप्रसंगी तक्रार निवारण केंद्राच्या विमल बिराजदार, मोरेश्वर पांचाळ, चंद्रशेखर केंगार , संजीव यादव आदी मान्यवर हजर होते.

Post a Comment

0 Comments