Latest News

6/recent/ticker-posts

पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष अशोकराव वाकळे पाटील यांच्याकडून ग्रामीण रुग्णालयास दोन एल. ई.डी.संच भेट

पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष अशोकराव वाकळे पाटील यांच्याकडून ग्रामीण रुग्णालयास दोन एल. ई.डी.संच भेट 



चाकूर:(तालुका प्रतिनीधी/सलीमभाई तांबोळी) येथील ग्रामीण रुग्णालयातील डेडीकेटेड कोरोना हेल्थ केअर सेंटर मध्ये उपचार घेत असलेल्या रूग्णांसाठी चाकुर तालुका पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष अशोकराव वाकळे पाटील यांनी दोन एलईडी टी.व्ही. संच भेट देण्यात आले. येथील ग्रामीण रुग्णालयातील डेडीकेटेड कोरोना हेल्थ केअर मध्ये ऑक्सिजनसह उपचार घेत असलेल्या रूग्णांना करमणुकीसाठी व तणावमुक्ती साठी चाकुर तालुका पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष अशोकराव वाकळे पाटील यांनी दोन एलईडी टी.व्ही. संच तहसीलदार डाॅ.शिवानंद बिडवे, वैद्यकीय अधिक्षक डॉ.दीपक लांडे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अर्चना पंडगे यांच्या उपस्थितीत देण्यात आले. यावेळी प्रशांत शेटे, संगमेश्वर जनगावे,सुधाकर हेमनर,विकास स्वामी,सदाशिव मोरे,प्रशांत भंडे,वर्धमान कांबळे,नाना सोनटक्के, विनोद निला आदि उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments