Latest News

6/recent/ticker-posts

ग्रामस्थांच्या पाठपुराव्यानंतर शिरोळ गावातील मुख्य चौकातील रस्त्याच्या कामास सुरवात

ग्रामस्थांच्या पाठपुराव्यानंतर शिरोळ गावातील मुख्य चौकातील रस्त्याच्या कामास सुरवात


शिरोळ वांजरवाडा:(प्रतिनिधी/सलीमभाई पठाण) येथे मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून 2019 ला केदारपूर ते शिरोळ रस्त्याचे काम पुर्ण झालं होतं.पण ऐन शिरोळच्या चौकातच या रस्त्याला 6 महिन्याच्या आतच खड्डे पडले होते. संबंधित विभागाच्या अभियंत्यांना वारंवार पाठपुरावा करणारे सामाजिक कार्यकर्ते दीपक पुंडे, प्रसाद जाधव, नवाज तांबोळी, झटिंग कदम, अरविंद कदम, सिध्देश्वर कांबळे, बंटि जाधव, ईश्वर जाधव यांच्या प्रयत्नाला शेवटी यश आले. संबंधित गुत्तेदाराकडे देखभाल दुरूस्तीचा कार्यकाल असल्यामुळे गुत्तेदाराने आज खड्डे बुजवण्याचे काम सुरू केले आहे. शाखा अभियंता तांभाळे यांनी पाठपुराव्यास सकारात्मक प्रतिसाद देऊन लवकर डागडूजी करण्यास गुत्तेदारास भाग पाडले. याबाबत गावकऱ्यांकडुन सर्वाचे कौतुक होत आहे.



Post a Comment

0 Comments