चाकुर रोटरी क्लबांचा अनोखा सामाजिक उपक्रम
चाकुर:(ता.प्र.सलीमभाई तांबोळी) चाकुर रोटरी क्लबच्या माध्यमातून अनेक सामाजिक उपक्रम राबवले जातात.सध्या कोरोनाच्या महामारीमुळे हाहाकार माजवला आहे.लोकांना वैद्यकिय सेवा लवकर उपलब्ध व्हावी म्हणून चाकुर येथील कोविड केअर सेटरला विविध वैद्यकिय साहित्य आज देण्यात आले.याठिकाणी काही आवश्यक गोष्टींची गरज लक्षात घेता चाकुर रोटरी क्लबच्या वतीने कॉट,गादी व बेडशीट,अशा साहित्याची गरज लक्षात घेऊन साहित्य रोटरी क्लबने चाकुर तहसीलदार डॉ.शिवानंद बिडवे यांच्या हस्ते साहित्य कोविड केअर सेटर दिले. चाकुर रोटरी क्लबच्या वतीने देण्यात आलेल्या साहित्यात १४ कॉट,१४ गाद्या,१४ बेडसीट,इ.साहित्य देण्यात आले.यासाठी रोटरी क्लब अॉफ चाकुर सदस्य पोलावार पांडुरंग,डॉ.चंद्रप्रकाश नागीमे,डॉ.एन.जी.मिर्झा,डॉ.लक्ष्मण कोरे,शैलेश पाटील,शिवदर्शन स्वामी,डॉ.केदार पाटील,विनायक पाटील,विकास हाळे,इ.रोटरी क्लबच्या सदस्यांनी पुढाकार घेतला.चाकुर कोविड केअर सेंटर मध्ये साहित्याचे वाटप करताना मुख्याधिकारी न.प.अजिक्य रणदिवे,तालुका आरोग्य अधिकारी डॉ.अर्चना पंडगे,वैद्यकिय अधिक्षक डॉ.दिपक लांडे,पञकार प्रशांत शेटे,सुधाकर हेमनर,विनोद निला,संगमेश्व जनगांवे,आदि उपस्थित होते. कोविड केअर सेंटरला वैद्यकिय साहित्य दिल्याबदल,व कोरोनाच्या माहामारीमुळे लोकांच्या मदतीसाठी दानशुर व्यक्ती व सामाजिक संघटनांनी पुढाकार घेण्यांचे आवाहन तहसीलदार डॉ.शिवानंद बिडवे यांनी केले.

0 Comments