Latest News

6/recent/ticker-posts

उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टरवर प्रशासनाने केलेली कार्यवाही योग्य- संभाजी ब्रिगेड

उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टरवर प्रशासनाने केलेली कार्यवाही योग्य- संभाजी ब्रिगेड


के वाय पटवेकर

निलंगा: आंध्रप्रदेश सरकारने घेतलेल्या निर्णयाच्या धर्तीवर महाराष्ट्र सरकारने सुद्धा सर्व खासगी व सरकारी रुग्णालयात कोरोना रुग्णांवर मोफत उपचार मिळवून द्यावा व उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टरवर प्रशासनाने केलेली कार्यवाही योग्यच आहे त्या निर्णयाचा संभाजी ब्रिगेड जाहीर समर्थन करत आहे. कोरोना सारख्या कठीण प्रसंगांमध्ये डॉक्टर, पोलीस, प्रशासन यांचं कार्य कौतुकास्पद आहे. तरीही काही संघटना काही लोकप्रतिनिधी प्रशासनाला बदनाम करण्याचा प्रयत्न करीत आहेत अश्या उलटसुलट बातम्या प्रसारमाध्यमातून ऐकावयास येत आहेत. संभाजी ब्रिगेड प्रशासनाच्या मागे खंबीरपणे उभे आहे कलेक्टर साहेबांनी डॉ. पाटील याचं केलेले निलंबन योग्यच आहे. त्याच आम्ही समर्थन करतो. तसेच महाराष्ट्र सरकारने सुद्धा आंध्र प्रदेश सरकारने घेतलेल्या निर्णयानुसार कोरोना रुग्णांना खाजगी आणि सरकारी दवाखान्यात मोफत उपचार करावे. कारण या टाळेबंदी च्या काळात सर्वसामान्य जनतेचं आर्थिकदृष्ट्या कंबरडे मोडलेले आहे याचा सारासार विचार करून हा निर्णय घ्यावा. या आशयाचे निवेदन उपविभागीय अधिकारी विकास माने यांना देण्यात आले. या निवेदनावर संभाजी ब्रिगेडचे तालुकाध्यक्ष प्रमोद कदम, परमेश्वर नांगरे पाटील, मसूद हस्मि, परमेश्वर बोधले, इरशाद शेख, बीबीशन चव्हाण आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Post a Comment

0 Comments