Latest News

6/recent/ticker-posts

भादा येथे भारतीय बौद्ध महासभा वर्धापन दिन साजरा

भादा येथे भारतीय बौद्ध महासभा वर्धापन दिन साजरा


बी डी उबाळे

औसा: भादा ता. औसा येथे भारतीय बौद्ब महासभा 66 व्या वर्धापन दिनानिमित्त राष्ट्रीय अध्यक्ष राजरत्न  अशोकराव आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली देशामध्ये हा वर्धापन दिन साजरा करण्यात येत आहे. त्या अनुषंगाने भादा येथे मंगळवार दि 4 मे 2021 रोजी गौतम बुद्ध आणि विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांची पूजा करण्यात आली. देशामध्ये सुरू असलेली कोरोना हि जागतिक महामारी यामुळे देशाचे आणि देशातील नागरिकांचे मोठे आर्थिक नुकसान होत असून दैनंदिन उपजीविकेचे साधन  सध्या बंद असल्याने अनेक नागरिक उपासमारीच्या वाटेवर आहेत. यामुळे शासनाच्या या विक्षिप्त धोरणामुळे जनता या कोरोना महाभारीमुळे जगावे की मरावे अशा अवस्थेत आहे. तर यानिमित्त आपल्या बौद्ध समाज यामध्ये भरडला जात आहे. तरी सर्व बौद्ध बांधवांनी आपला संयम आणि शांती न सोडता  शासनाने दिलेल्या नियमानुसार आपण आपली दिनचर्या आणि नियम पाळून कामे सुरू ठेवली पाहिजे आणि एकमेकांना सर्व बाजूनी सहकार्य केले पाहिजे आणि एकसंघ राहून आपली दिनचर्या  सुरू ठेवली पाहिजे. तसेच एकमेकांचा आधार बनून  एकमेकांना मानसिक आधार दिला पाहिजे ज्यामुळे सर्वांची ताकत एकत्र होऊन या महामारी वर आपण सहज मात करू. याप्रसंगी आपण धीर धरून दिनचर्या सुरू ठेवली पाहिजे असे वक्तव्य यावेळी अक्षय उबाळे या सामाजिक कार्यकर्तेनी बोलून दाखविले,तसेच याठिकाणी सामूहिक बुध्द वंदना,धम्म वंदना,संघ वंदना घेण्यात आली. यावेळी भादा उपसरपंच बालाजी शिंदे,तंटा मुक्त समिती अध्यक्ष सूर्यकांत पाटील,ग्रा प सदस्य सूर्यकांत उबाळे,योगेश लटूरे,युवा सामाजिक कार्यकर्ते अक्षय उबाळे,निशांत उबाळे  सह लातूर जिल्हा भारतीय बौद्ध महासभा जिल्हा संपर्क प्रमुख बालाजी उबाळे आदी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments